राजर्षी शाहू महाराज माहिती | Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

 

➲ राजर्षी शाहू महाराज :-


नाव :  राजर्षी शाहू महाराज 

जन्म :  २६ जून इ.स. १८७४ 

जन्म ठिकाण :  कोल्हापूर,कागल  

वडील :  आबासाहेब

आई :  राधाबाई 

पत्नी :  महाराणी लक्ष्मीबाई भोसले 

राज्याभिषेक :  २ एप्रिल १८९४ 

लोकांनी दिलेली पदवी  :   राजर्षी

मृत्यू :  ६ मे  इ.स. १९२२ 




शाहू महाराज 




१९ व्या शतकाच्या पूर्वाधात जे प्रबोधन पूर्व सुरु झाले. त्या प्रबोधन पर्वातील एक अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. अवघे ४८ वर्षाचे आयुष्य शाहू महाराजांना लाभले. पण या आयुष्यातील त्यांनी २८ वर्षाची कारकीर्द ही सामाजिक कार्याची होती. या काळात त्यांनी समाज उन्नतीचे नवे नवे प्रयोग केले. त्यांना महाराणी आनंदाबाई यांनी दत्तक घेतले,व त्यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले.


राजकोट येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. १८९० ते १८९४ या काळात सर एफ.एम.फ्रेजर या गर्डीयनच्या मार्गदर्शनाखालील इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास, राज्यकारभार इ. विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी धारवाड येथे केला. बडोद्याचे गुनाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्यांचा विवाह १८९० मध्ये झाला. त्यांना एक मुलगी झाली नंतर ३ अपत्ये झाली. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे त्यांनी हाती घेतली.


शाहू महाराजांच्या जीवनकार्याची सुरुवात होत चं इ.स. १८९४ पासून त्यांच्या राज्यरोहण समारंभपासून  महाराजांनी दलित वर्गासाठी केलेले कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे . त्या काळात दलितांच्या शोचनीय स्थिती पाहून त्यांना फार वाईट वाटे. दलितांच्या ठिकाणी स्वाभिमानाने व अस्मितेचे स्फुलिंग प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण भारत भर महाराजांनी व्याखाने दिली.दलितांच्या परिषदेचे ते अध्यक्ष झाले.कायद्याचे विषेश अवबंडर व माजवता वर्णवर्च स्वाला गाडण्यासाठी, महाराजांनी अस्पुश्यांना मानाच्या जागा दिल्या . भर सभेत त्यांच्या हातचे पाणी पिणे,वाड्यावर अस्पुश्य नोकर ठेवणे , कोर्टात कारकून,गावात तलाठी नेमणे, वकिलीच्या सनदा देणे ही कामे त्यांनी दलितांना दिली. महाराजांनी, हिंदू समाजातील अपुश्य आणि मागासवर्गीय यांना सर्वांच्या बरोबर आणण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरु केला, तेव्हा फार मोठा संघर्ष करावा लागला. 


सामाजिक समता,स्वतंत्र,बंधुता आणि न्याय ही तत्वे व्यवहाराच्या पातळीवर म्हणजे आचरणात आणण्यासाठी शाहू महाराजांना धार्मिक, शैक्षणिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात काम करावे लागले.सरकारी खात्यात ज्या जागा रिकाम्या होतील, त्यातील ५० % जागांमध्ये मागासवर्गीय सुशिक्षित तरुणांची भरती करावी , असा जाहीरनामा त्यांनी काढला.


वर्णव्यवस्थेचे कटू अनुभवामुळे आणि धर्मरुधीच्या प्रभावामुळे ब्राम्हणांचे श्रेष्ठत्व अबाधित मानणाऱ्या उच्चवर्णीयांच्या अहंकाराला शह देण्यासाठी त्यांनी अब्राम्हनांमधून वैदिक तयार करण्याची इच्छा बाळगली. बहुजनसमाजातून वैदिक तयार होण्यासाठी त्यांनी १९ ऑगस्ट १९१९ रोजी शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केले.येथील शाळेतील विद्यार्थी धर्मविधी सुरु करून , त्यांनी चातुवर्ण्य व्यवस्थेला सुसुंग लावला.बालविवाहाला आळा घालण्याचे फर्मान काढले.कामगार लढ्याला उत्तेजन दिले. अनाथांसाठी अनाथालये चालविले. विदाभ्यासाचा अधिकार सर्व लोकांना दिला.


कोल्हापूर संस्थानात सर्व समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी केली. निरनिराळ्या खात्यांतीलपदवीधरांची उणीव दूर करणे, राज्यकारभारातील एक विशिष्ठ वर्गाच्या वर्चस्वाला आळा घालणे आणि राजकारण व राज्यकारभार यामध्ये सामाजिक शक्ती सबल असल्या पाहिजेत , हा हेतू त्यांच्या शिक्षण कार्याच्या बुडाशी होता. त्यामुळे शिक्षानापासून वंचित असलेला समाज शाहूंच्या अथक परिश्रमामुळे जागृत झाला. त्यांनी समाजातील सर्व जातींच्या विद्यार्थी साठी वसतिगृहे काढली व त्यांना अनुदाने दिली. लोकांच्या शिक्षणाभिमुख केले. त्यांच्या प्रयत्नामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमानही झपाट्याने वाढले.


सारांश, राजर्षी शाहू महाराज कृतीशील दालीतोध्दारक होते. आधी केले मग सांगितले या भावनेने त्यांनी कार्य. म्हणून दलितांच्या कनवाळू राजा म्हणून ते प्रसिध्दीस आले. १९१३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सुधारित शेतीला प्रसार करण्यासाठी त्यांनी institute स्थापन केले. शेतीमालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरु झाला पाहिजे, तरच समृद्धी येईल  यासाठी शाहपुरी ही बाजारपेठ स्थापन केली. क्रीडा,कला यांचेही महाराज भोक्ते होते. रोममध्ये पाहिलेल्या आखड्यासारखे  कुस्त्यांचे त्यांनी पहिले मैदान बांधले. नाट्य,चित्रपट,संगीत, या कलांनाही त्यांनी आपल्या दरबारात उदार आश्रय दिले.


अशा या युग प्रवर्तक राजाला ४८ वर्षाचे आयुष्य लाभले ओं त्यांनी केलेले कार्य आज २१ व्या शतकातही प्रेरणादायी ठरेल.कारण ते कृतीशील सुधारक होते. त्यांच्या कर्तुत्वाच्या ठसा चिरंतन भावी पिढ्यांच्या मनात कोरला जाईल.

  • शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात " सामाजिक न्याय दिवस " म्हणून पाळला जातो .
  • कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल trust तर्फे " राजर्षी पुरस्कार " रोख १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.

 

 शाहू महाराजांचे शिक्षण आणि योगदान :-

त्यांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथील राजकुमार महाविद्यालयात झाले. १८९४ मध्ये ते  कोल्हापूर संस्थानाचे  राजा झाले . जातीवादामुळे समाजातील एका वर्गाला त्रास होत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी दलितांच्या उत्थानासाठी एक योजना बनवली आणि ती राबवायला सुरुवात केली. छत्रपती शाहू महाराजांनी दलित आणि मागास जातीच्या लोकांसाठी शाळा उघडल्या आणि वसतिगृहे बांधली.

 त्यामुळे त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार होऊन सामाजिक स्थिती बदलू लागली. परंतु उच्चवर्गीय लोकांनी त्यास विरोध केला. ते छत्रपती शाहू महाराजांना आपले शत्रू मानू लागले.

त्याच्या पुजार्‍यानेही सांगितले की- “तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेदांचे मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही. या सर्व विरोधाला छत्रपती शाहू महाराजांनी खंबीरपणे तोंड दिले. 

शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारताला भेट दिली. ते कोल्हापूरचे महाराज असले तरी त्यांनाही त्यांच्या भारत दौऱ्यात जातीवादाचे विष प्यावे लागले. नाशिक, काशी आणि प्रयाग येथे त्याला सनातनी ढोंगी ब्राह्मणांचा सामना करावा लागला. त्यांना साहुजी महाराजांना विधी करायला भाग पाडायचे होते पण साहुजींनी नकार दिला.

जातीच्या आधारावर समाजातील एका वर्गावर दुसऱ्या वर्गाकडून होणारा अत्याचार पाहून शाहूजी महाराजांनी त्याला विरोध तर केलाच शिवाय दलित उत्थानाच्या योजना बनवून त्या अमलात आणल्या.

 

 आरक्षण प्रणाली :-

1902 मध्ये शाहू महाराज इंग्लंडला गेले होते. त्यांनी तेथून आदेश काढून कोल्हापूर अंतर्गत प्रशासनातील ५० टक्के पदे मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवली. महाराजांच्या या आदेशामुळे कोल्हापुरातील ब्राह्मणांना मोठा धक्का बसला. शाहू महाराजांनी 1894 साली राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा कोल्हापूरच्या सामान्य प्रशासनातील एकूण 71 पदांपैकी 60 पदांवर ब्राह्मण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती हे विशेष. तसेच 500 लिपिक पदांपैकी फक्त 10 ब्राह्मणेतर पदे होती. शाहू महाराजांनी मागासलेल्या जातींना संधी दिल्याने 1912 मध्ये ब्राह्मण अधिकाऱ्यांची संख्या 95 पैकी 35 पदांवर आली. 

1903 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्य मठाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. किंबहुना, मठाला राज्याच्या तिजोरीचा मोठा पाठिंबा होता. कोल्हापूरच्या माजी महाराजांनी ऑगस्ट 1863 मध्ये काढलेल्या आदेशानुसार, कोल्हापूर मठाच्या शंकराचार्यांनी आपला उत्तराधिकारी नियुक्त करण्यापूर्वी महाराजांची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु तत्कालीन शंकराचार्य या आदेशाला बगल देत संकेश्वर मठात राहायला गेले. कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर होते. 

23 फेब्रुवारी 1903 रोजी शंकराचार्यांनी आपला उत्तराधिकारी नियुक्त केला. हे नवे शंकराचार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे निकटवर्तीय होते. 10 जुलै 1905 रोजी त्याच शंकराचार्यांनी घोषणा केली की- "कोल्हापूर हे क्षत्रिय घराण्यातील भोसले घराण्याची जागा असल्याने, गादीचे वारसदार छत्रपती साहू महाराज हे स्वभावाने क्षत्रिय आहेत.


शाहूं महाराजांचे कौटुंबिक जीवन :-

शाहू महाराजांना चार बायका होत्या ज्यांनी दोन मुलगे आणि चार मुलींना जन्म दिला. शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजे (छत्रपती संभाजी महाराज नव्हे) होते. 

महाराजांनी पार्वतीबाई नावाची मुलगी 3 वर्षांची असताना दत्तक घेतली. ती 15 वर्षांची असताना त्यांनी तिचा विवाह श्रीमंत सदाशिव राव भाऊंशी केला. त्यांच्या लग्नाचा व राहण्याचा खर्चही शाहूंनीच उचलला होता.

याशिवाय शाहूने फतेहसिंग पहिला आणि राजाराम दुसरा या दोन मुलांनाही दत्तक घेतले. शाहूच्या मृत्यूनंतर, त्याचा दत्तक पुत्र राजाराम दुसरा मराठा साम्राज्याच्या गादीवर बसला.


शाहू महाराजांचा मृत्यू :-

  छत्रपती शाहू महाराज यांचे ६  मे १९२२ रोजी मुंबईत निधन झाले. महाराजांनी पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. समाजातील कोणत्याही घटकाशी त्यांचे वैर नव्हते. शाहू महाराजांना दलित वर्गाबद्दल नितांत स्नेह होता. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्यांनी केलेले क्रांतिकारी उपाय इतिहासात स्मरणात राहतील.



👉 शाहू महाराजांबद्दल काही प्रश्न :-


१. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे राजे केव्हा झाले ?

उत्तर : " २ जुलै १८९४ "


२. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव ?
 
उत्तर : " यशवंतराव "


३. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्युनंतर कोल्हापूरच्या गादीवर कोण आले ?

उत्तर : " शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज हे गादीवर आले "


४. शाहू महाराजांना किती बायका होत्या  ?

उत्तर : " ४ "


५.  शाहू महाराजांना किती मुले होते ?

उत्तर : " ५ मुले व ५ मुली "











To Top