छत्रपती संभाजी महाराज माहिती | Chatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi


➲ छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले :-



"   सिंहाची चाल , गरुडा ची नजर ,

स्त्रियांचा आदर , शत्रूचे मर्दन , असेच 

असावे मावळ्यांचे वर्तन , हीच

छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण ! "




नाव :  संभाजीराजे शिवाजीराजे भोसले 

जन्म :   १४ मे १६५७ , पुरंदर किल्ला (पुणे) 

वडिल :   छत्रपती शिवाजी महाराज 

आई :   सईबाई भोसले 

पत्नी:   येसूबाई भोसले 

मूले:   शाहूमहाराज व राजकुमारी भवनीबाई 

राज्याभिषेक :  २६ जानेवारी इ.स. १६८१ 

मृत्यु:   ११ मार्च १६८९ 

चलन :  होन

धर्म : हिंदू 






 
हिंदू धर्मरक्षक 





संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते .


खूप लहानपणी ते आपल्या आईच्या प्रेमाला मुकले ,त्यांची आजी राजमाता जिजाऊ त्यांना संभाजी महाराजांना सांभाळ केला .पुरंदरच्या तहानुसार ते अवघ्या नऊ वर्षाचे असताना मुघलांच्या गोटात ओलीस राहिले .कोवळ्या वयात मैलांचा प्रवास करत .शिवारायांसोबत आग्रा येथे गेले तेथे त्यांनी विविध भाषा  व मुघल सत्तेचा जवळून परिचय झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले .संभाजी राजे हे अनेक भाषेत विद्याविशारद,अत्यंत धुरंधर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले

 

१६७४ मध्ये शिवाजी महारांचा राज्याभिषेक झाला ,त्यावेळी संभाजी महाराजांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावरआलेल्या प्रतिनिधीना त्यांनी आपलेसे केले.संभाजीराजांना साधुसंताबद्दल आदरभाव होता .


छत्रपती संभाजीराजे ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा , ज्यांनी ' बुधभूषणम ' हा संस्कृत तर ' नायिकाभेद ' ' नखशिख ' ' सातसतक ' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले. हा थोर राजा जसा लेखनीतही श्रेष्ठ होता.तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता. बुद्धिमत्ता आणि शौर्य श्री शंभूराजांमध्ये भरले होते . आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला.स्वराज्यातील एकही किल्ला गमावला नाही . मराठ्यांचे आरमार शक्तिशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य वाढविले . पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले.औरंगजेबाच्या सैन्याची दणादण उडवली, असा हा छावा छत्रपती संभाजीराजे एकाच वेळी मोघल,इंग्रज,पोर्तुगीज,सिद्धीशी लढत होते. 


⇨ संभाजी महाराजांचे जन्म आणि शिक्षण :-

संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराजांचे संगोपन त्यांची आजी जिजाबाई यांनी केले. कारण तो 2 वर्षांचा असताना त्याची आई सईबाई वारली होती. संभाजी महाराजांना छावा असेही संबोधले जात असे


⇨ संभाजीराजांचे बालपण :-


छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ साली पुरंदर किल्यावर झाला.आणि महारष्ट्राला दुसरे छत्रपती लाभले.  महाराज २ वर्षाचे असतांनाच त्यांनी त्यांच्या आई सईबाई यांचे ( दि. ५ सप्टेंबर १६५९) निधन झाले .राजमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला.संभाजी महाराज लहानचे मोठे जिजाबाईंच्या हाती झाले. सगळ्याचं संभाजीराजांवर खूपच प्रेम होतं.सोबतच त्यांची सावत्र आई पुतळाबाई यांनीदेखील महाराजांवर अतिशय प्रेम केले .परंतु त्यांची दुसरी आई सोयराबाई यांनी महाराजांना पोरक्या प्रमाणे वागवले.त्यांनी नएहामी त्यांचेच मुल पुढे जावं अस वाटायचं .


" जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते ,
पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी "

            शंभूराजे.         



 छत्रपती शिवरायांनी संभाजी राजे अवघे ९ वर्षाचे असतांना त्यांना आग्रा भेटीसाठी सोबत नेले .आग्रा भेटीसाठी संभाजी राजेंनी मोघलांची पंचहजारी मनसबदारी मिळाली होती.त्यामुळे जेव्हा औरंगजेबाने कपटाने छत्रपती शिवरायांना  कैदेत टाकले त्यावेळी संभाजीराजेंचा ,छत्रपती शिवरायांना खूप उपयोग झाला.
सन १६७४ साली राज्याभिषेकानंतर १२ दिवसात जिजाउंचे निधन झाले त्यामुळे संभाजीराजे पोरखे झाले.तर छत्रपती राजारामच्या जन्मामुळे सोयराबाई संभाजीराजेंकडे दुर्लक्ष करू लागल्या. संभाजीराजे अत्यंत शूर व देखने होते ,त्यांना भ्रष्टाचार खपत नसे.





|| शंभू मुद्रा ||

 श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || 
 

मराठी अर्थ :-  शिवपुत्र श्री शंभू राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते  आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे, त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !




संभाजी महाराजांचा विवाह :-

  संभाजी महाराजांचा विवाह पिलाजीराव सरके यांच्या कन्या जीवूबाईशी झाला. ते राजकीय प्रकरण होते. लग्नानंतर येवुबाईंनी तिचे नाव बदलून येसूबाई ठेवले. लग्नानंतर संभाजी महाराज आणि येवुबाई यांना प्रथम एक मुलगी झाली, तिचे नाव भवानीबाई होते. त्यानंतर एक मुलगा झाला आणि त्या मुलाचे नाव शाहू महाराज ठेवण्यात आले.



⇛ छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले युद्ध:- 

संभाजी महाराज वयाच्या 16 व्या वर्षी पहिले युद्ध लढले आणि ते युद्ध देखील जिंकले. या युद्धात ते 7 किलो वजनाच्या तलवारीने लढले. 1681 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आपला सर्वात मोठा शत्रू औरंगजेबाचा नाश केला.

छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्षाच्या आयुष्यात 120 लढाया केल्या. पण कोणत्याही लढाईत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्यांनी सर्व लढाया जिंकल्या होत्या. 



⇛ संभाजी महाराजांचा राज्याभिषेक :-

शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर दुःखाचे सावट पसरले. तरीही या परिस्थितीत संभाजी महाराजांनी स्वराज्याची जबाबदारी पूर्णपणे सांभाळली. संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना गादीवर बसवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कार्यकाळात या लोकांना या कामात यश मिळू शकले नाही. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.



शिवाजी महाराजांचा मृत्यु आणि संकटाची वेळ :-


शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा मराठ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, त्यावेळी औरंगजेब हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू होता. त्याला वाटले की आता शिवाजीनंतर त्याचा  मुलगा आपल्यासमोर फार काळ टिकू शकणार नाही. त्यानंतर १६८० मध्ये औरंगजेब दक्षिणेकडील पठारावर आला.

 

औरंगजेबासोबत 50 लाख आणि 400,000 जनावरांची फौज होती. १६८२ मध्ये मुघलांनी रामसाई किल्ल्याला महिने वेढा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या कामात तो यशस्वी होऊ शकला नाही.

 

पुढे 1687 मध्ये वाईच्या युद्धात मुघल सैन्यासमोर मराठा सैनिक कमकुवत होऊ लागले आणि याच दरम्यान फेब्रुवारी 1689 मध्ये संघमेश्वर येथे संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केले.



 👉छत्रपती संभाजी महाराजाबद्दल काही प्रश्न :-


१. संभाजी महाराजानंतर ३ रे छत्रपती कोण होते ?

उत्तर :   " छत्रपती राजाराम महाराज "


२ संभाजी महाराजांनी किती युद्धे लढली ?

उत्तर : " १२० युद्धे  "


३.संभाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?

उत्तर :  " १६ जानेवारी १६८१ "



४. संभाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला ?

उत्तर :  " पुरंदर किल्ला "



५.  संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे ?

उत्तर : " तुळापुर महाराष्ट्र "










To Top