छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती | Chatrapati Shivaji Maharaj Information In Marathi


 मराठा साम्राज्याचे संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराज :-       




🚩  " अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी , 

उधळण होईल भगव्या रक्ताची आणि 

फाडली जरी आमची छाती ,

 तरी मूर्ती 

दिसेल आमच्या शिवरायांची .

जय शिवराय !   🚩⛳                           

             


नाव :  शिवाजीराजे शहाजीराजे भोसले 

जन्म :    १९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी ,पुणे  

वडिलांचे नाव :   शहाजीराजे भोसले 

राज्याभिषेक:   ६ जून १६७४ 

राजधानी :   रायगड 

आईचे नाव :   जिजाबाई भोसले

पत्नी :   सईबाई, सोयराबाई ,पुतळाबाई ,काशीबाई ,सकवारबाई ,लक्ष्मीबाई,सगनाबाई ,गुणवंतीबाई.       
मुले :   संभाजीराजे,राजारामराजे 

मृत्यु:   ३ एप्रिल १६८० 

राजघराणे : भोसले .

धर्म : हिंदू 




     शिवाजीराजे शहाजीराजे भोसले 

                                                                      
                                                                          छत्रपती 
शिवाजी महाराज
जाणता राजा 



शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला.महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.


शिवाजी महाराज हे मराठा सम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.त्यांनी 'गामिनी कावा ' तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रुंचा पराभव केला. 06 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झ्हाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना सामान न्याय व सामानतेची वागणूक दिली. दुर्दैवाने, 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराज्यांनी अखेरचा स्वा्श घेतला.


छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते .आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो.आपण सर्व त्यादिवशी  किती आनंदात असतो.महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतो,पोवाडे म्हणतो,त्यांच्या फोटो ला हार घालतो.मोठ्या उत्साहाणे "छत्रपती शिवाजी महाराज कि जय "असा महाराजांच्या नावाचा जयजयकार करतो.


शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता .त्या काळी सर्वत्र राजेशाही अंमल असे.बरेचं राजे प्रराजे हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत;पण त्या काळातही असे काही  राजा होऊन गेले,की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले .उत्तरेतील मुघल सम्राट अकबर ,दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कळण्यासाठी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत.त्यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्टात स्वराज्य निर्माण केले.स्वराज्य म्हणजे स्वतः चे राज्य .महाराजांपुर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते.महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता.ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते.त्यांच्यात नेहमी लढाया होत.त्यात रयतेचे हाल होत .रयत सुखी नव्हती .उघडउघड उत्सव करणे,पूजा करणे धोक्याचे झाले होते.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते.रहायला सुरक्षित निवाराही नव्हता .सगळीकडे अन्याय माजला होता.महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख,देशपांडे इत्यादी वतनदार होते , पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते.देशावर त्यांचे प्रेम नव्हते.प्रेम होते फक्त वतनावर,जहागिरीवर ,वतनासाठी ते एकमेंकाशी भांडत.आपापसात लढत.त्यात रयतेचे खूप हाल होत.या साऱ्या गोष्ठीमुळे रयत त्रासून गेली होती.सगळीकडे अंधाधुंनी माजली होती.


शिवाजी महाराजांनी हे सारे पहिले.रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे पवित्र त्यांनी हाती घेतले.भांडखोर वतदारांना त्यांनी वठणीवर आणले.स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला.तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.जुलमी राजवटींचा पराभव केला.न्यायचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले.हे स्वराज्य सेवा जातीधर्मांच्या लोकांचे होते.स्वराज्यात कोणताही भेदभाव केला नाही.सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सम्मान केला.अशी ही  महाराजांची थोर कामगिरी पाहिली, कि आपल्याला प्रेरणा मिळते, स्फ्रर्ती  मिळते.


शिवाजी महाराजांचे कार्य आजही  आपल्या सर्वांना प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते.त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणुकीतून स्फृती घेतली होती .वैयत्तिक महात्त्वाकांक्षेतून केवळ स्वतः साठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती.तत्कालीन राज्य पद्धतींच्या गुणावगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले वैशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था यांची आखणी केली.महाराज स्वतः  धर्मनिष्ठ  हिंदू होते .तसेच इतर धर्माविषयीची त्यांची भावना सहिष्णूतेची होती.इतर धर्मीयांच्या पूज्यं स्थानासाठी त्यांनी इनामे दिली.शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते.स्वतंत्ररक्षणासाठी आरमाराची आवश्यकता व महत्व त्यांना पटले होते.इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले .प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्रातील निपुणता दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतिक होते.  

 

समर्थ  रामदासांनी असे म्हंटले आहे कि,धर्मासाठी बलिदान होईन मरा,मारा आणि स्वराज्य प्राप्त करा.हे वचन त्यांच्या अनेक भक्तांनी ऐकले,पण पूर्ण रुपात ज्यांनी ते साकार केले ,ती थोर व्यक्ती म्हणजे राजे शिवाजी महाराज.

 


👉शिवजन्म :-


ते दिवस फार धामधुमीचे होते.उत्तरेकडून मुघल बादशहा शाहजहान याने दख्खन से करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते.शहाजीराजांच्या जहागिरीचे जाव पुणे.विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते.शहाजीराजे अडचणीत सापडले होते.इकडे आड तिकडे विहीर!शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष आले.अशात जिजाबाई गरोदर होत्या ,तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे,हा प्रश्न उभा राहिला.शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली.जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले.शिवनेरी हा पुणे जिल्ह्यांतील जुन्नरजवळील किल्ला.त्यांच्या चारी बाजूंनी उंच कडे भक्कम ततबंधी आणि बळकट दरवाजे होते.किल्ला मोठा मजबूत होता.विजयराज हर त्याचे किल्लेदार होते.ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते.जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले.


आणि तो सोन्याचा दिवस उजाडला.फाल्गुन वद्य तृतीय शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०.शिवनेरीच्या नगारखान्यात सनई,चौघडा वाजत होता.अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला.किल्ल्यावर आनंदीआनंद झाला.बाळाचे बारसे झाले.शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव "शिवाजी" ठेवले.



शिवरायांचे  बालपण :- 


  शहाजी राजाकडे त्यावेळी पुण्याची जहागिरी होती. मात्र आदिलशहाने पुण्याची पुरती वाताहत केली होती. शहाजीराजे धमधुमीत आणि धावपळीत होते. अशातच जिजाबाई गरोदर होत्या शहाजीराज्यांनी त्यांना जुन्नर जवळील शिवनेरी किल्यावर सुरक्षित ठेवले.



शिवनेरी 





अखेर शिवनेरीवर तो सोन्याचा दिवस उगवला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडे वाजू लागले. जिजाबाईना पुत्ररत्न झ्हाले. अवघ्या हिंदुस्थानाच्या क्षितिजावर नवीन तेजोमय सूर्य उगवला बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांची बालपणीची पाच वर्षे खूपच धावपळीत  गेली मात्र या धावपळीत जिजाऊंनी त्यांना उत्तम शिक्षण व संस्कार दिले.बालपणी त्यांच्या मनावर जिजाबाईनी चांगले संस्कार केले होते .


जिजामाता बाळशिवबाला राम, कृष्णा, भीम, अर्जुन, अभिमन्यू, भीष्म, या विराच्या कथा सांगत तसेच संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांचे अभंगही  म्हणून दाखवत असत.रामायण -महाभारतातील कथा सांगून त्यांच्या बालमनात वीर आणि महान बनवण्याची इच्छा जिजाबाईनी निर्माण केली होती.
गरीब मावळ्यांची मुले हेच शिवरायांचे सावंगडी होते. शिवराय त्याच्या सोबत विविध खेळ खेळत जंगलातील प्राणी -पक्षांचा हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती, घोडे व किल्ले रचने हे त्यांचे छंद!लपंडव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. व खोट्या खोट्या लढायांचे खेळ खेळत असत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडत शिवरायही आपल्या संवगड्यावर जीवापाड प्रेम करत. त्यांच्या झोपडीत जात त्याच्या घरची मिरची भाकर आवडीने खात.त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत असत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू  रानातील पाखरे! ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. 



स्वराज्यस्थापनेचे कार्य :-


सत्ता,संपत्ती,सैन्य व किल्ले या चार आधारस्तंभावर स्वराज्य मंदिर राजांनी अतोनात प्रयत्न केला व तो सिद्धीस नेला.तोरणा ,राजगड, कोंढाणा आणि चाकण व इतर किल्ले घेतले.पण त्यावेळी शिवाजी महाराजांनी दाखवलेले कौशल्य,धडाडी,युद्धनीती ही कोणत्याही धुरंधर नेत्याला साजेशी अशीच होती . अफजलखानासारख्या शक्तिशाली सेनापतीच्या पोटात वाघनखे खुपसून मोठ्या चातुर्याने त्यांनी त्याचा वध केला.


विजापूरचे दुसरे सरदार सिद्दी जोहरने पन्हाळ्याच्या भीषण वेढा घातला होता,त्यातून महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली.पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची नाचक्की केली.शिवाजी महाराजांना आपल्या काबूत आणण्यासाठी,औरंगजेबाने शाहिस्तेखान व दिलेरखानांना पाठविले होते,पण त्या दोघांना महाराजांनी हरविले.शेवटी राजा जयसिंहाला पाठविले गेले.त्यांच्या सांगण्यावरून महाराज आग्र्याला गेले.तेथून कौशल्यपूर्वक स्वतःची सुटका करून घेतली.ती आग्राची मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका होय.हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने ह्या घटना त्यांच्या आयुष्यात महत्वाच्या ठरतात.


शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.मरगळलेल्या मराठी जनतेच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी आपल्या रक्तामांसाचा राजा आपल्यावर राज्य करतो आहे, जणता सुखी राहावी,ह्या सर्व हेतुंनी त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला .राज्यावर बसल्यावर त्यांनी राजगड ही आपली राजधानी केली.राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांनी राज्यात सुधारणा सुरु केल्या. करवसुली,शांतीस्थापणा,सेनेचे संघटन,शेती इ. क्षेत्रांत मौलिक सुधरणा केल्या स्थलसेनेबरोबरच आरमार ही ही संघटना केली  व तिही साधनसामग्री वाढविली.त्या काळात मराठी भाषेची प्रगती झाली.



शिवराज्याभिषेक सोहळा :-                                                            


राज्याभिषेकाचा दिवस उजाडला, ६ जून १६७४ रोजी रायगड महामंगल दिवस होता तो ,वाद्ये वाजू लागली.गवई गाऊ लागले .सगळीकडे आनंदीआनंद झाला.शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले.त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली.तूप,दही,मध,यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते.गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती.तिच्यात गंगा,सिंधू,यमुना,गोदावरी,कृष्ण,नर्मदा वं कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते .गागाभट्टानी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले.घागरीच्या शंभर छीद्रातून शिवरायांवर जलभिषेक झाला.मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले.मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले.त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले . त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्ठाचे चीज झाले.शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वप्नं आज साकार होत आहे .आईचा आनंद अश्रूवाटे बाहेर पडला.



गागाभट्ट यांनी या हा राज्याभिषेक केला.या राज्याभिषेकात ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले.या राज्याभिषेकात ब्राम्हण ,राज्यांचे प्रतिनिधी,वेदेशी व्यापारी ,श्रीमंत व्यक्ती ,व  सामान्य जनताअसे सर्वत्र उपस्थित झाले.टा राज्याभिषेक सोहळ्यासाठी तब्बल साडेचार हजार राजांना निमंत्रण दिले होते.
महाराज सिंहासनावर बसले,त्याच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले.गागाभट्टानी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले -
"क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो."सर्वांनी जयजयकार केला.
 गडावर तोफा झाल्या.सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जयजयकार झाला.अशा प्रकारे सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला.त्या सालापासून महाराजांनी "राज्याभिषेक"हा शक सुरु केला.त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली.निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते.हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते.शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली.शिवरायांची किर्ती सर्वत्र पसरली .

 शिवप्रभूचा अवतार म्हणजे साक्षात शिवाचाच अवतार ! 




शिवरायांचे शिक्षण :-


स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गडे पंडित होते.त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता.शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती.ते वयाला सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला.थोड्याच वेळात शिवराय लिहिण्या-वाचण्याच्या कलेत पारंगत झाले.रामायण,महाभारत,भागवत यांतील गोष्ठी ते स्वतः वाचू लागले.शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती.त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसने,कुस्ती खेळणे,दांडपट्टा फिरवणे,तलवार चालावाने इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला.


लवरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात नायकांची राज्ये जिंकण्यास मोहिमेवर पाठवले.या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली.त्या वेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती,घोडे,पायदळ,खजिना,ध्वज,तसेच विश्वासू प्रधान,शूर सेनापती आणि विख्यात शिक्षक यांना त्यांच्या सोबत पाठवले.


शिवराय हे पुणे जहागिरीत आले,तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालू राहिले.बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी अनेक शास्रे,विद्या व भाषा शिकवल्या.
उत्तम राज्यकारभार कसा करावा,शत्रूशी युद्ध कसे करावे,किल्ले कसे बांधावे,घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी,शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी.अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या .शिरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला.





👉शिवरायांची राजमुद्रा :-



राजमुद्रा 



शिवरायांच्या नावाने जहागिरीत कारभार सुरु झाला होता.शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.ती  मुद्रा अशी -


 "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"


या राजमुद्रेचा अर्थ :-  प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे .
ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता.त्या काळात राजमुद्रा फार्सी भाषेत कोरलेल्या असत,पण शिवरायांची मुद्रा संस्कृती भाषेत होती.स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी,स्वधर्म हवा.त्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको.शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी सुरु केला आहे.




👉हिंदवी स्वराज्य :-


   
हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते."हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे " ; मग ते कोणत्याही धर्माचे असोत,कोणत्याही जातीचे असोत.त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य.शत्रू बलाढ्य होते,पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही.काळ कठीण होता,पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही.बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते,पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली.बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत.


शिवरायांनी छोट्याशा जहाजिरीतून स्वराज्य निर्माण केले,अशक्य होते ते शक्य करून दाखवले ,म्हणून शिवरायांचे चरित्र पुन्हापुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते.त्यांच्या चरित्रातून स्फृर्ती मिळते.
 




👉स्वराज्याची राजधानी :-


शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली.रायगड हा मजबूत किल्ला होता.रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते.शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते.चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली.प्रतापगडाच्या भवानीदेवीचे दर्शन घेतले.तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले.



➦ छत्रपती शिवरायांचे आई वडील :-


  •  शहाजीराजे भोसले - वडील 
  •  राजमाता जिजाऊ  - आई 

 ➦ छत्रपती शिवरायांचे बहिण / भाऊ :-


  • संभाजीराजे - शिवाजी महाराजांचा भाऊ 
  • व्यंकोजी - सावत्र भाऊ 
  • संताजी - सावत्र भाऊ 


➦ छत्रपती शिवरायांच्या पत्नी :-


  • सईबाई 
  • सगुणाबाई 
  • सोयराबाई 
  • गुणवंताबाई 
  • काशीबाई 
  • सकवारबाई 
  • लक्ष्मीबाई 
  • पुतळाबाई 




➦ छत्रपती शिवरायांची मुले / मुली :-


  • धर्मवीर संभाजी राजे  - सईबाई चा मुलगा 
  • कमलाबाई - सकवारबाई ची मुलगी 
  • दीपाबाई - सोयाराबाई ची मुलगी 
  • राजाराम - सोयराबाई चा मुलगा 
  • राजकुंवरबाई - सगुणाबाई ची मुलगी 
  • सखुबाई,राणूबाई,अंबिकाबाई - सईबाई च्या मुली 


➦  छत्रपती शिवरायांची नातवंडे :-

  •  शाहू महाराज 
  • भवनीबाई 
  • शिवाजी ( दुसरे )
  • अंबिकाबाई 
  • संभाजी ( दुसरे )



➨ छत्रपती शिवरायांचे विचार व्यक्त करणारे काही वाक्य :- 


  • स्वातंत्र्य हे एक वरदान आहे त्याला प्रत्येकजण पात्र आहे .
  • संकटाला सामोरे जाणे आवश्यक नाही , शत्रूला तोंड देणे आवश्यक आहे .
  • सूड माणसाला जळत नसतो , संयम हाच सुडावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग .
  • छोट्या ध्येयावर एक लहान पाऊल , नंतर मोठे ध्येय साध्या करते .



" रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया 

चाराणार्थी अर्पितो आजन्म ही काया 

जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती 

प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया

                 छत्रपती शिवाजी महाराज की जय "








👉छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल काही प्रश्न :-





१. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले ?

उत्तर :" छत्रपती शिवाजी महाराज हे ५३ वर्षे जगले. पण कोणत्याही राज्याला जे ५०० वर्षाच्या कार्यकाळात जमले नाही त्यांनी ते ५३ वर्षात करून दाखवले ."



२. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?

उत्तर : " ६ जून १६७४ "



३. शिवाजी महाराजांचा  राज्याभिषेक कोणत्या गडावर  झाला ?

उत्तर : " रायगड "



४. हिंदवी स्वराज्य व्हावे ही कोणाची इच्छा होती ?

उत्तर -  " हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे "



५. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?

उत्तर -  " १६४५ साली रायारेश्वराच्या  देवालयात "




➢ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वर्णन काही पुस्तके :-


1.




Amazon वरून खरेदी करा Link :- https://amzn.to/3TBhuot
 


२.
 


      Amazon वरून खरेदी करा Link :- https://amzn.to/3Pm1FiS




3.





         Amazon वरून खरेदी करा Link :- https://amzn.to/4ckn99C




4.




Amazon वरून खरेदी करा Link :- https://amzn.to/3IBQFu7



5. 



Amazon वरून खरेदी करा Link :- https://amzn.to/3VleSwm



6.


    

Amazon वरून खरेदी करा Link :- https://amzn.to/4925y3n





आवडली तर नक्की खरेदी करा 💓



To Top