डॉ. राजेंद्र प्रसाद माहिती | Dr. Rajendra Prasad Information In Marathi

 

  डॉ. राजेंद्र प्रसाद :-

                                                                         "   स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती  "                                                                           


नाव :  डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय 

जन्म :  ३ डिसेंबर १८८४ 

जन्म ठिकाण :  जिरादेई गाव ( बिहार )

मृत्यु :  २८ फेब्रुवारी १९६३ 

मृत्यु ठिकाण : पटना ( बिहार )

वडील :  महादेव सहाय 

आई :  कमालेश्वरी देवी 

पत्नी :  राजवंशी देवी 

पुरस्कार :  " भारतरत्न "

अध्यक्ष :  घटना समिती अध्यक्ष 

राजकीय पक्ष :  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस 

राष्ट्रपती पद काळ : सन  १९५० - १९६२ 



डॉ.राजेंद्र प्रसाद 



स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे नाव सर्व भारतीयांना परिचित आहे . बिहार मध्ये सारन नावाच्या जिल्ह्यांतील जिरादेई या गावी त्यांचा ३ डिसेंबर १८८४ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव सहाय श्रीवास्तव हे संस्कृत आणि फारशी या दोन्ही भाषांचे अभ्यासक होते .व त्यांची आई चे नाव कमलेश्वरी देवी . डॉ. राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या भावंडात सर्वात लहान होते आणि त्यांना एक मोठा भाऊ व तीन मोठ्या बहिणी होत्या . राजेंद्र प्रसाद लहान असतांनाच त्यांची आई वारली होती . त्यानंतर त्यांच्या मोठ्या बहिणींनी च त्यांची काळजी घेतली.


डॉ. राजेंद्र प्रसादांचे प्राथमिक शिक्षण हे एका मौलविकडे झाले. अगदी थोड्याच अवधीत ते उर्दू व फारशी या भाषा शिकले . १८९३ साली छपरा येथील जिल्हा विद्यालयात त्यांना पाठवले . त्यांचे शिक्षण चालू असतांनाच त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला . १९०८ साली ते मैट्रिक पास झाले . त्यांना अनेक बक्षिसे व शिष्यवृत्या मिळाल्या . त्यानंतर कोलकत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांनी प्रवेश घेऊन तेथून बी.ए. पुढे एम. ए. व नंतर एल.एल.बी . ह्या पदव्या त्यांनी घेतल्या. कॉलेजात त्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविले गेले.  वाचन,वकृत्व व लेखन हे तिन्ही छंद त्यांनी उत्तम प्रकारे जोपासले होते . बालपणापासून त्यांना समाजसेवेची आवड होती . अध्यात्मिक ग्रंथाचा त्यांचा व्यासंग खूप दांडगा होता .


आपल्या जीवनातील सर्वोच्च ध्येय हे देशसेवा आहे , असे राजेंद्र प्रसाद यांनी मानले . कॉंग्रेसच्या १९०६ सालच्या कलकत्याच्या अधिवेशनात राजेंद्र प्रसाद यांनी स्वयंसेवकाचे १९९१ सालच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून काम पहिले . १९१३ सालच्या ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे ते सभासद झाले तर १९३४ साली ते कॉंग्रसचे अध्यक्ष झाले. काही दिवसात त्यांनी मुझफरपूर येथील कॉलेजात इंग्रजांचे व कलकत्ता येथील सिटी कॉलेज मध्ये अर्थाशास्राचे प्राध्यापक म्हणून काम पहिले .  कायद्याविषयीच्या उत्तम ज्ञानामुळे ते वकिली करू शकले . याचवेळी गोपाल कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केला होता . त्यांना तरुण लोक देशकार्यासाठी पाहिजेन होते . राजेंद्र प्रसादांवर त्यांचा फार मोठा प्रभाव पडला .



१९१२ साली कलकत्ता येथे हिंदी साहित्य संमेलन झाले . त्या संमेलनाचे ते मुख्य चिटणीस होते . याचवेळी त्यांची चंपारण्यमें महात्मा गांधी व मेरे युरोप के अनुभव  ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली .


बंगाल व बिहारमध्ये पूर आल्यानंतर पुराग्रस्थांच्या मदतीसाठी त्यांनी फार मोठे कार्य केले .चंपारण्यात निळीच्या लागवडीच्यावेळी गोरे लोक त्यांना त्रास देत . स्त्रियांवर अत्याचार करीत . अशावेळी महात्मा गांधीनी केलेल्या सत्याग्रहात ते सामील झाले .  सत्याग्रहाची पूर्ण माहिती देणारे पुस्तक त्यांनी १९१८ साली प्रसिद्ध केले . महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला . ६ जानेवारी १९२१ ला पाटना येथे बिहार राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना झाली . त्याय्त त्यांचा सहभाग मोठा होता . खादीचा प्रसारही त्यांनी प्रकर्षाने केला . 


बिहार मध्ये त्यांनी जागोजागी खादिकेंद्र उघडण्यात आली .  त्यानंतर त्यांनी १९२४ साली पाटना म्युनिसिप म्युनिसिपाल्त्तीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९४२ मध्ये ब्रिटीशांच्या सत्तेविरुद्ध झालेल्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला . तेव्हा त्यांना इंग्रजांनी पाटना येथील बाकीपूर तुरुंगात त्यांना ठेवले . तेव्हा १०४२ दिवस कारागृहात व्यतीत करीत असतांना , त्यांनी द्विखंड भारत हा ग्रंथ लिहिला . व तो १९४६ ला प्रसिद्ध झाला . १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला . २६ जानेवारी १९५२ रोजी प्रजासत्ताक भारताचे ते पहिले राष्ट्रपती झाले . राष्ट्रपती पद त्यांनी १२ वर्षे सांभाळले . १९५८ साली जपानमधील ओहतानि व रीयुकोकू या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली . १९६२ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला . राजेंद्र प्रसाद यांनी राजकारणातून निरुत्त झाले. १८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांच्या जीवनाचा अध्याय संपला. पाटना येथे प्रसादजींच्या स्मरणार्थ  " राजेंद्र स्मृती संग्रहालय " बांधण्यात आले ."



राजेंद्र प्रसाद ते साधे व सरळ होते . राष्ट्रपती झाल्यावरही त्यांनी साधे कपडेच परिधान केले . परोपकार हा त्यांचा जीवनाचा स्थायीभाव होता . देशप्रेमाने भरून जाऊन स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी हिररीने भाग घेतला . त्यांनी समाजाची सेवा अगदी नि:स्पृहपने   केली . राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ते समतोल बुद्धीने वागले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या खोलीत एक सुभाषित लिहिलेले होते ते असे - 


हरीयायी न हिंमत विरीयाई ना हरीको नाम |

जाही विधे रखियाई राम वही विधे रहिया ||

                             अर्थ : "  हिंमत सोडू नका व ईश्वराला विसरू नका . राम जसे ठेवील तसे राहावे " .


डॉ. राजेंद्र प्रसाद बद्दल काही महत्वाची माहिती :-

  • 1906 मध्ये राजेंद्रबाबूंच्या पुढाकाराने 'बिहारी क्लब'ची स्थापना झाली.व त्यांचे ते सचिव झाले.
  • 1908 मध्ये राजेंद्र बाबू मुझफ्फरपूरच्या ब्राह्मण कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले आणि काही काळ ते त्या कॉलेजच्या शिक्षक पदावर राहिले.
  • 1909 मध्ये त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकवले.
  • 1911 मध्ये राजेंद्र बाबूंनी कलकत्ता उच्च न्यायालयात कायदेशीर प्रॅक्टिस सुरू केली.
  • 1914 मध्ये बिहार आणि बंगाल या दोन राज्यांमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोकांना बेघर व्हावे लागले होते. राजेंद्रबाबूंनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रात्रंदिवस काम केले.
  • 1916 मध्ये त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली.
  • 1917 मध्ये महात्मा गांधी सत्याग्रहासाठी चंपारणला गेल्याचे समजताच राजेंद्रबाबूही तेथे गेले आणि त्या सत्याग्रहात सामील झाले.
  • 1920 मध्ये ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात सामील झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘देश’ नावाचे हिंदी भाषेतील साप्ताहिक काढले.
  • 1921 मध्ये राजेंद्र बाबुने यांनी बिहार विद्यापीठाची स्थापना केली.
  • 1924 मध्ये ते पाटणा महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • 1928 मध्ये हॉलंडमध्ये 'वर्ल्ड यूथ पीस कौन्सिल' आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारताच्या वतीने राजेंद्र बाबू यांनी भाग घेतला होता आणि भाषणही केले होते.
  • 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगात खराब अन्न खाल्ल्यानंतर त्याला दमा झाला. त्याचवेळी बिहारमध्ये मोठा भूकंप झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी ‘बिहार सेंट्रल टिलीफ’ या समितीची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी 28 लाख रुपये मदत गोळा करून भूकंपग्रस्तांना वाटले.


डॉ राजेंद्र प्रसाद यांची पुस्तके :-

राजेंद्र प्रसाद जी हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, एक प्रामाणिक राजकारणी तसेच साहित्यप्रेमी होते. अतिशय सोप्या आणि व्यावहारिक भाषेत त्यांनी आपल्या महान विचारांनी अनेक रचना संपादित केल्या. त्यांची काही महत्त्वाची कामे पुढीलप्रमाणे –

 

  • माझे आत्मचरित्र
  • बाबू बापूंच्या चरणी
  • माझा युरोपचा प्रवास
  • भारताची फाळणी झाली
  • चंपारण येथील सत्याग्रह
  • गांधीजींचे योगदान
  • भारतीय शिक्षण
  • भारतीय संस्कृती आणि खादीचे अर्थशास्त्र
  • साहित्य
  • शिक्षण आणि संस्कृती

डॉ.राजेंद्र प्रसाद यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान :-

1962 मध्ये, त्यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानासाठी भारतातील सर्वोत्तम नागरी सन्मान "भारतरत्न" प्रदान करण्यात आला.

ते एक विद्वान, हुशार, दृढनिश्चयी आणि उदारमतवादी व्यक्ती होते.


डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन :-

 

28 फेब्रुवारी 1963 रोजी डॉ.प्रसाद यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक घटना आहेत ज्यावरून हे सिद्ध होते की राजेंद्र प्रसाद हे अतिशय दयाळू आणि शुद्ध स्वभावाचे होते. भारतीय राजकीय इतिहासात त्यांची प्रतिमा एक महान आणि नम्र राष्ट्रपती अशी आहे. प्रसादजींच्या स्मरणार्थ पटण्यात 'राजेंद्र मेमोरियल म्युझियम' बांधण्यात आले आहे .


डॉ . राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल काही प्रश्न :-


१.  डॉ . राजेंद्र प्रसाद का प्रसिद्ध आहे ?

उत्तर : डॉ. प्रसाद यांनी असहकार चळवळ , मीठ सत्याग्रह आणि इतर स्वतंत्र सैनिकांसोबत भारत छोडो आंदोलनात त्यांची फार मोठी भूमिका आहे .


२. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर : " डॉ.  राजेंद्र प्रसाद "


३. डॉ.  राजेंद्र प्रसाद यांचा जन्म कुठे झाला ?

उत्तर : बिहार येथील जिरादेई गाव येथे 


४. डॉ . राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न  केव्हा देण्यात आला ?

उत्तर : १९६२ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान , " भारतरत्न " त्यांना देण्यात आला .


५. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन कधी झाले ?

उत्तर : १८ फेब्रुवारी १९६२ 







To Top