➲ डॉ. बाबासाहेब आंबेडकर :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
शिका ..!
संघटीत व्हा !
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही पुस्तके :-
- जातीचा विनाश
- भारतातील जाती : त्यांची प्रणाली , उत्पती आणि विकास
- ईव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
- हु वर द शुद्राज
- बुद्ध का कार्ल मार्क्र्स
- थाॅटस् ऑफ पाकिस्तान
- द बुद्ध & हिज भम्म
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेले सन्मान :-
➤ १९९० ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यास आले आहे .
➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य आधिकारिक चित्र भारतीय संसद भवन मध्ये लावण्यात आले आहे .
➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा नागपूर येथे आहे ज्याचे पूर्वीचे नाव सोनेगाव विमानतळ असे होते .
➽ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची माहिती :-
- १९२७ मध्ये " बहिष्कृत भारत " नावाचे पाक्षिक सुरु केले .
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ ला मुंबई च्या GOVERMENT कॉलेज ला शिक्षक म्हणून निवडले गेले .
- १९४६ ला " पीपल्स एज्युकेशन सोसायटी " या संस्थेची स्थापना केली .
- स्वतंत्रानंतर त्यांनी पहिल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणून काम केले.
- १९५६ ला नागपूर येथील ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्या ५ लाख अनुयांसह त्यांनी बौद्ध धर्माची शिक्षा दिली.
- १९२० ला त्यांनी ' मूकनायक " हे वृतपत्र सुरु केले .
- १९२० ला कोल्हापूर येथे झालेल्या अस्पुश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला .
- सामाजिक सुधारकांना राजकीय आधार असावयास हवा म्हणून त्यांनी १९३६ ला " इंडिपेंडंट लेबर पार्टी " ची स्थापना केली .
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम करून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या .
- गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहभाग घेतला .
- १४ जून १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली .
➽ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील सत्याग्रहे व आंदोलने केली :-
- अंबादेवी मंदिर सत्याग्रह :- अमरावती येथील प्राचीन असे अंबरादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पुश्यांनी माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स. १९२५ मध्ये आंदोलन सुरु केले .
- पर्वती मंदिर सत्याग्रह :- पुण्यातील पर्वती टेकडी वरील मंदिर अस्पुश्यांना खुले नव्हते हे मंदिर खुले करण्यासाठी त्यांनी १३ ऑक्टोंबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरु केला .
- काळाराम मंदिर सत्याग्रह :- काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी यासाठी आंबेडकरांनी सर्वांना केलेले एक आवाहन होते .
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांच्या मोर्च्यात सहभाग घेत , व त्यांची समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधात असत .
➽ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची व टी:व्ही मालिका यांची निर्मिती करण्यात आली त्यापैकी काही :
➣ चित्रपट :-
- रमाई ( २०१९ मधील मराठी चित्रपट )
- बोले इंडिया जय भीम ( २०१६ मधील मराठी चित्रपट )
- शुद्र : द रायझिंग ( २०१२ मधील हिंदी चित्रपट )
- डॉ. बी.आर. आंबेडकर ( २००५ मधील कन्नड चित्रपट )
- युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( १९९३ मधील मराठी चित्रपट )
- डॉ. आंबेडकर ( १९९२ मधील तेलगु चित्रपट )
- बालक आंबेडकर ( १९९१ मधील कन्नड चित्रपट )
- भीम गर्जना ( १९२० मधील मराठी चित्रपट ) व इतर .
➣ टी:व्ही मालिका :-
- संविधान ( २०१४ मधील हिंदी मालिका )
- प्रधानमंत्री ( २०१३-१४ मधील हिंदी मालिका )
- डॉ. आंबेडकर ( २०१४ मधील हिंदी मालिका )
- गर्जा महाराष्ट्र ( २०१८ - १९ मधील मराठी दूरचित्रवाणी मालिका )
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची कथा ( २०१९-२० मधील मराठी दूरचित्रवाणी मालिका )
- एक महानायक : डॉ. बी.आर. आंबेडकर ( २०१९-२० मधील हिंदी दूरचित्रवाणी मालिका )
➣ नाटके :-
- बाबासाहेब थे ग्रेट म्युझिकल
- वादळ निळ्या क्रांतीचा
- डॉ. आंबेडकर व गांधीजी
- प्रतिकार
➽ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काही प्रश्न :-
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती मुले होती ?
उत्तर : डॉ. बाबासाहेब व रमाबाई यांना यशवंत ,गंगाधर ,इंदू , रमेश ,आणि राजरत्न अशी पाच मुले होती .
२. डॉ. बाबासाहेब यांचे मूळ नाव काय होते ?
उत्तर : लहानपणीचे नाव " भीमा "असे होते .
३. डॉ. बाबासाहेब यांची जयंती कधी असते ?
उत्तर : " १४ एप्रिल "
४. बौद्ध धर्माच्या श्रद्धा की आहेत ?
उत्तर : " कर्म,पुनर्जन्म आणि नश्वरता "
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ स्वतःची किती पुस्तके आहेत ?
उत्तर : एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तके , 10 साक्षीपुरावे ( निवेदने ) ,10 शोधनिबंध ,लेख व 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ . हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे .