छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती | Chatrapati Shivaji Maharaj Information In Marathi


 मराठा साम्राज्याचे संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराज :-       




🚩  " अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी , 

उधळण होईल भगव्या रक्ताची आणि 

फाडली जरी आमची छाती ,

 तरी मूर्ती 

दिसेल आमच्या शिवरायांची .

जय शिवराय !   🚩⛳                           

             


नाव :  शिवाजीराजे शहाजीराजे भोसले 

जन्म :    १९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी ,पुणे  

वडिलांचे नाव :   शहाजीराजे भोसले 

राज्याभिषेक:   ६ जून १६७४ 

राजधानी :   रायगड 

आईचे नाव :   जिजाबाई भोसले

पत्नी :   सईबाई, सोयराबाई ,पुतळाबाई ,काशीबाई ,सकवारबाई ,लक्ष्मीबाई,सगनाबाई ,गुणवंतीबाई.       
मुले :   संभाजीराजे , राजारामराजे 

मृत्यु:   ३ एप्रिल १६८० 

राजघराणे : भोसले .

धर्म : हिंदू 




     शिवाजीराजे शहाजीराजे भोसले 

                                                        





छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.

शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व एक आदर्श, न्यायप्रिय, धर्मनिष्ठ राजा होते. त्यांनी अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. "गनिमी कावा" या युद्धतंत्राचा वापर करून त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून बलाढ्य शत्रूंना पराभूत केले.

6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान वागणूक दिली, न्यायप्रिय प्रशासन दिले आणि रयतेचा विश्वास संपादन केला. 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आपण दरवर्षी शिवजयंती मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरी करतो. महाराजांच्या प्रतिमेला हार घालतो, पोवाडे म्हणतो, त्यांच्यावर गाणी म्हणतो आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" असा जयघोष करतो.

महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ अत्यंत कठीण होता. निजामशाही व आदिलशाहीचे अत्याचार, रयतेवर जुलूम, अन्नाचा अभाव, सुरक्षिततेचा अभाव – या साऱ्या अंधारात शिवाजी महाराज हे आशेचा किरण बनून आले. ते फक्त आपल्या राज्यासाठी नव्हे, तर संपूर्ण रयतेच्या सुखासाठी लढले.

स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, रयतेचे राज्य. महाराजांनी हे स्वराज्य उभारताना वतनदारांचे राजकारण, परकीय सत्तांचे जुलूम, धर्मभेद – या साऱ्यांवर मात केली. सर्व धर्मांच्या संतांचा, पवित्र स्थळांचा त्यांनी सन्मान केला.

शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते, ते एक कुशल रणनीतीकार, प्रशासक आणि धर्मनिष्ठ राजा होते. त्यांनी आपल्या राज्यात आरमार उभारले, किल्ल्यांची बांधणी केली आणि डच, इंग्रज यांच्यापासून संरक्षण केले. त्यांची युद्धनीती, स्वराज्याचे स्वप्न आणि रयतेवरील प्रेम हे सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात:

"धर्मासाठी मरा, मारा आणि स्वराज्य प्राप्त करा"
या वाक्याचे खरे साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच होते.


➤ शिवजन्म – मोलाचा क्षण

ते दिवस खूप धामधुमीचे आणि अस्थिरतेचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शाहजहान याने दख्खनवर आक्रमण करण्यासाठी मोठे सैन्य पाठवले होते. शहाजीराजे भोसले यांची पुण्याजवळची जहागिरी विजापूरच्या आदिलशहाने बेचिराख केली होती. त्यामुळे शहाजीराजे अडचणीत सापडले होते. धावपळ, अस्थिरता, धोका – या सगळ्या काळजीत जिजाबाई गरोदर होत्या. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित जागी ठेवणे आवश्यक होते. म्हणूनच शहाजीराजांना जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली.

शिवनेरी किल्ला हा अत्यंत भक्कम आणि सुरक्षित होता. चारही बाजूंनी उंच कडे, मजबूत तटबंदी आणि बळकट दरवाजे असलेला हा किल्ला शत्रूंना सहज जिंकता येणारा नव्हता. किल्ल्याचे किल्लेदार विजयराज हर हे भोसल्यांच्या नात्यातलेच होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि जिजाबाईंना किल्ल्यावर ठेवलं.

आणि अखेर तो सोन्यासारखा दिवस उजाडला – फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३०. त्या दिवशी शिवनेरीच्या नगारखान्यात सनई-चौघडे वाजू लागले. मंगलमय वातावरणात जिजाबाईंनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. किल्ल्यावर आनंदाचं वातावरण पसरलं. बाळाच्या बारशाच्या वेळी, तो शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आल्यामुळे त्याचं नाव 'शिवाजी' ठेवण्यात आलं.


➤ शिवरायांचे बालपण

शहाजी राजाकडे त्या काळी पुण्याची जहागिरी होती. मात्र, आदिलशहाने पुण्याची मोठी वाताहत केली होती. शहाजीराजे त्या काळी धावपळीत आणि चिंतेत होते. अशातच, जिजाबाई गरोदर होत्या. शहाजीराजांनी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जुन्नर जवळील शिवनेरी किल्यावर नेले.

अखेर, १९ फेब्रुवारी १६३० रोजी, शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडे वाजू लागले. जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाला. संपूर्ण हिंदुस्थानाच्या क्षितिजावर एक नवीन तेजस्वी सूर्य उगवला, आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं – शिवाजी.

शिवरायांची बालपणीची पाच वर्षे खूपच धावपळीत गेली, पण या काळात जिजाबाईंनी त्यांना उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. बालपणी त्यांच्या मनावर जिजाबाईंनी घालवलेले संस्कार खूपच प्रभावशाली होते.

जिजामातांनी बाळशिवबाला राम, कृष्ण, भीम, अर्जुन, अभिमन्यू, भीष्म यांसारख्या वीरांच्या कथा सांगितल्या. तसेच संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, आणि संत एकनाथ यांचे अभंगही त्यांना ऐकवले. रामायण आणि महाभारतातील कथा सांगून त्यांनी बाळशिवाच्या मनात वीर आणि महान होण्याची ज्योत पेटवली.

शिवरायांचे सावंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुले होती. शिवराय त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळत, जंगलातील प्राणी-पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढत असे. मातीचे हत्ती, घोडे आणि किल्ले तयार करणे हे त्यांचे आवडते छंद होते. लपंडव, चेंडू, भोवरा हे त्यांच्या नेहमीचे खेळ होते. शिवराय आणि मावळ्यांच्या मुलांमध्ये फारच घट्ट मैत्री होती.

शिवराय मावळ्यांच्या झोपड्यांत जात असे आणि त्यांच्या घरची मिरची भाकर आवडीने खात असे. मावळ्यांसोबत खेळत, गमतीदार खेळ खेळत, शिवराय त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असे. मावळ्यांची मुले जणू रानातील पक्ष्यांसारखी होते, आणि शिवराय त्यांच्या आवाजांची नक्कल हुबेहूब करीत असे.


➤ स्वराज्य स्थापनेचे कार्य

शिवाजी महाराजांनी सत्ता, संपत्ती, सैन्य आणि किल्ले या चार आधारस्तंभांवर स्वराज्य स्थापनेसाठी अथक प्रयत्न केले आणि तो कार्य सिद्धीस नेले. तोरणा, राजगड, कोंढाणा, चाकण आणि इतर किल्ले त्यांनी जिंकले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी दाखवलेले कौशल्य, धडाडी आणि युद्धनीती कोणत्याही धुरंधर नेत्याला साजेशी होती.

अफजलखानासारख्या शक्तिशाली सेनापतीच्या पोटात वाघनखे खुपसून, त्यांनी मोठ्या चातुर्याने त्याचा वध केला. विजापूरचा सरदार सिद्दी जोहर पन्हाळ्यावर भीषण वेढा घातला होता, मात्र महाराजांनी स्वतःची सुटका केली.

पुण्याच्या लालमहालात शाहिस्तेखानाची नाचक्की केली. शिवाजी महाराजांना आपल्या काबूत आणण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखान आणि दिलेरखानांना पाठवले, पण त्यांना महाराजांनी पराभूत केले. नंतर राजा जयसिंहाला पाठवले गेले, ज्यांच्या सुचनेवरून महाराज आग्र्याला गेले आणि तिथून कौशल्यपूर्वक स्वतःची सुटका केली. ही सुटका आग्र्याच्या मिठाईच्या पेटाऱ्यातून झाल्यामुळे इतिहासात महत्त्वाची मानली जाते.

हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने या घटना त्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.


➤ राज्याभिषेक आणि राज्यकारभार 

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मरगळलेल्या मराठी जनतेच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी, आपल्या रक्तामधील राजा आपल्या देशावर राज्य करतो आहे, ही भावना जागृत करण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला.

राज्यावर बसल्यानंतर त्यांनी राजगड आपल्या राजधानीस म्हणून निवडले. राज्याभिषेकानंतर त्यांनी राज्यात अनेक सुधारणा सुरू केल्या. कर वसुली, शांतता स्थापणा, सेनेचे संघटन, शेती या क्षेत्रांमध्ये मौलिक सुधारणा केल्या.

शिवाजी महाराजांनी स्थळसेनेबरोबरच आरमार ही संघटना केली आणि तिन्ही साधनसामग्री वाढविली. या काळात मराठी भाषेचा सुद्धा मोठा विकास झाला.


 शिवराज्याभिषेक सोहळा :-

राज्याभिषेकाचा दिवस उजाडला, ६ जून १६७४ रोजी रायगडावर महामंगल सोहळा पार पडला. वाद्ये वाजू लागली, गवई गाऊ लागले, सगळीकडे आनंद-उत्साहाचे वातावरण होते. शिवराय सोन्याच्या चौरंगावर विराजमान झाले. त्यांच्यावर छत्र-चामरे धरण्यात आले. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. त्या घागरमध्ये गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते.

गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली आणि मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी त्यांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे फळ समोर आले होते. शिवबाच्या जन्मापूर्वीपासून त्या माउलीने मनात धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रूवाटे बाहेर पडला.

गागाभट्टांनी हा राज्याभिषेक संपन्न केला. या सोहळ्यासाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले. या कार्यक्रमात ब्राह्मण, राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी, श्रीमंत व्यक्ती आणि सामान्य जनताही उपस्थित होते. तब्बल साडेचार हजार राजांना निमंत्रण दिले होते.

महाराज सिंहासनावर विराजमान झाले. त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे बसले होते. गागाभट्टांनी सोन्याच्या मोत्याच्या झालरीचे छत महाराजांच्या डोक्यावर धरले आणि मोठ्याने घोषणा केली –

“क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो.”

सर्वांनी जोरदार जयजयकार केला. गडावर तोफांच्या कडकडाटाने आणि महाराष्ट्रभर शिवरायांच्या जयजयकाराने वातावरण गजरले.

अशा प्रकारे सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या दिवसापासून महाराजांनी “राज्याभिषेक” हा शपथ घेतला. त्यांनी स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभाला हजर होते. दूरदूरचे प्रजाजनही हा सोहळा पाहण्यासाठी जमले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची ख्याती संपूर्ण जगाला कळाली आणि त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली.

शिवप्रभूचा अवतार म्हणजे साक्षात शिवाचाच अवतार !


➤ शिवरायांचे शिक्षण

स्वतः शहाजीराजे संस्कृतचे प्रवीण पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांचे पंडित आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठीही त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती.

शिवरायांचे वय सहा-सात वर्षे झाल्यावर त्यांचे शिक्षण सुरू झाले. थोड्याच काळात ते लिहिण्य-वाचण्यात पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथांचे ते स्वतः वाचन करू लागले.

शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी तज्ञ शिक्षक नेमले होते. त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसण्यापासून कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे यासारख्या विविध विद्या शिकविल्या.

अशा प्रकारे, शिवरायांच्या बाराव्या वर्षापर्यंत त्यांना विविध कला आणि विद्या अवगत झाल्या.

लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात नायकांची राज्ये जिंकण्यासाठी मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी, शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवरायांना पुणे जहागिरीकडे पाठवले. त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनापती आणि विख्यात शिक्षक पाठवले.

शिवराय पुण्यात आल्यावर जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण सुरू राहिले. बंगळूरहून आलेल्या नामवंत शिक्षकांनी त्यांना अनेक शास्त्र, विद्या आणि भाषा शिकविल्या.

शिवरायांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे आणि हत्ती यांची परीक्षा कशी घ्यावी, तसेच शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून कसे निसटून जायचे याची सखोल माहिती दिली गेली.

शिवरायांच्या शिक्षणातील प्रगती पाहून जिजाबाईंना फार आनंद झाला.


➤ शिवरायांची राजमुद्रा

शिवरायांच्या नावाने त्यांच्या जहागिरीत कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी त्यांच्या पुत्रासाठी स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ही मुद्रा पुढील प्रमाणे होती:

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

या राजमुद्रेचा अर्थ असा आहे:
"प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि संपूर्ण विश्वाला वंद्य असलेली ही शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा आहे, जी लोकांच्या कल्याणासाठी आहे."

ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात बहुतेक राजमुद्रा फारसी भाषेत कोरल्या जात असत, पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. यावरून त्यांच्या स्वाभिमानाची आणि संस्कृतीशी असलेली जिद्द स्पष्ट होते.

शिवरायांनी नेहमी स्वराज्याची भाषा, स्वधर्म आणि स्वसंस्कृती जपली. त्यांनी स्वराज्याचा पाया लोककल्याणावर आणि सर्व धर्मांवर समान आदर ठेवून ठेवला. दुसऱ्या धर्माविरुद्ध द्वेष नको, असा त्यांचा संदेश होता.

शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी सुरू केला होता.


➤ हिंदवी स्वराज्य

हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते.
"हिंदवी" म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत. त्यांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य.

  • शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत कधीच सोडली नाही.
  • काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान टिकवला.
  • बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवरायांनी न्यायाचा मार्ग स्वीकारला.
  • बलाढ्य परकीय सत्तेसमोर ते कधीच नमले नाहीत.

शिवरायांनी छोट्या जहाजिरीतून स्वराज्य निर्माण केले, अशक्य ते शक्य करून दाखवले. म्हणून त्यांच्या चरित्रातून आम्हाला स्फूर्ती मिळते.


➤ स्वराज्याची राजधानी

  • शिवरायांनी राजधानीसाठी रायगड ची निवड केली.
  • रायगड हा मजबूत किल्ला असून, स्वराज्यावर नजर ठेवणे सोपे होते.
  • शिवरायांनी चिपळूण येथे आपल्या सैन्याची पाहणी केली.
  • प्रतापगडाच्या भवानीदेवीचे दर्शन घेत सोन्याचे छत्र अर्पण केले.


➤ छत्रपती शिवरायांचे आई-वडील

  • वडील : शहाजीराजे भोसले
  • आई : राजमाता जिजाऊ

➤ छत्रपती शिवरायांचे भाऊ-बहिण

  • संभाजीराजे (भाऊ)
  • व्यंकोजी (सावत्र भाऊ)
  • संताजी (सावत्र भाऊ)


➤ छत्रपती शिवरायांच्या पत्नी

  • सईबाई
  • सगुणाबाई
  • सोयराबाई
  • गुणवंताबाई
  • काशीबाई
  • सकवारबाई
  • लक्ष्मीबाई
  • पुतळाबाई


➤ छत्रपती शिवरायांची मुले-मुली

  • धर्मवीर संभाजी राजे (सईबाईचा मुलगा)
  • कमलाबाई (सकवारबाईची मुलगी)
  • दीपाबाई (सोयराबाईची मुलगी)
  • राजाराम (सोयराबाईचा मुलगा)
  • राजकुंवरबाई (सगुणाबाईची मुलगी)
  • सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई (सईबाईच्या मुली)



➤ छत्रपती शिवरायांचे नातवंडे

  • शाहू महाराज
  • भवनीबाई
  • शिवाजी (दुसरे)
  • अंबिकाबाई
  • संभाजी (दुसरे)



➤ छत्रपती शिवरायांचे विचार (महत्त्वाचे वाक्य)

  • स्वातंत्र्य हे एक वरदान आहे, त्याला प्रत्येकजण पात्र आहे.
  • संकटाला सामोरे जाणे आवश्यक नाही, शत्रूला तोंड देणे आवश्यक आहे.
  • सूड माणसाला जळत नसतो, संयम हाच सुडावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.
  • छोट्या ध्येयावर एक लहान पाऊल, नंतर मोठे ध्येय साधते.



➤ छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती

"रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया,
चाराणार्थी अर्पितो आजन्म ही काया.
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती,
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!"

 

➤ छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महत्त्वाचे प्रश्न

1.छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

उत्तर:  ५३ वर्षे. त्यांनी ५३ वर्षांत ते काम केले जे अनेक राज्यांना ५०० वर्षांतही जमले नाही.


2. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला?

उत्तर: ६ जून १६७४

3. राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

उत्तर: रायगड


4. हिंदवी स्वराज्य व्हावे ही कोणाची इच्छा होती?

उत्तर: शिवाजी महाराजांच्या मनात ही इच्छा होती.

5. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली?

उत्तर: १६४५ साली रायारेश्वर देवालयात.








To Top