महात्मा ज्योतिबा फुले माहिती | Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

 


➲ महात्मा ज्योतिबा फुले :- 

  " नवभारताच्या निर्मितीमध्ये ज्या महान भारतीय विचारवंतांनी आणि समाजसुधारकांनी महत्वाची भर घातली,त्यात ज्योतिबा फुले अद्वितीय होते,आधुनिक काळात लोकांनी त्यांना स्वयंस्फ्रुतीने महात्मा हा सन्मान अर्पण केला.ज्योतिबा हे स्वावलंबी ,स्वतंत्र असे मौलिक विचारवंत व क्रांतिकारक होऊ न गेले. एका सामान्य माळ्याच्या घरात जन्मलेला हा एक महापुरुष व समाजसुधारक होते ."


  


नाव :  महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले 

जन्म :  ११ एप्रिल १८२७ 

ठिकाण :  पुणे,महाराष्ट्र 

जिल्हा :  सातारा 

आई :  चिमणाबाई फुले 

वडील :  गोविंदराव शेरीबा फुले 

पत्नी :  सावित्रीबाई फुले 

धर्म :  हिंदू 

मृत्यु :  २८ नोव्हेंबर १८९० 




महात्मा ज्योतिबा फुले  



ज्योतिबा फुले हे न्यायमूर्ती म.गो.रानडे आणि लोकहितवादी यांचे समकालीन होते.हे एक महान भारतीय समाजसुधारक,विचारवंत आणि क्रांतिकारक होते.त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले हे होते .आईचे नाव  चिमणाबाई आणि वडिलांचे नाव जोविंद होते.इ.स. १८२८ मध्ये सातारा जिल्ह्यांतील कटगुण येथे त्यांचा जन्म झाला.ज्योटी हे नाव प्रकाश देणाऱ्या ज्योतीवरून ठेवले गेले.लहानपणीच ते मातृछतला पारखे झाले.त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला.वयाच्या सहाव्या वर्षी ते शाळेत गेले.प्राथमिक शिक्षण संपल्यावर ते शेतमळ्यात जाऊन काम करू लागले.त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठविले.पण आपल्या मित्राबरोबर काही कार्यक्रमात गेल्यावर त्यांना तुच्छतापूर्वक वागणूक मिळत असे.याचा फार मोठा परिणाम त्यांच्या मनावर झाला.तत्कालीन रूढीनुसार त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यांतील खंडाळा तालुक्यातील खंडूजी पाटील यांच्या सावित्री नावाच्या कन्येशी झाला ती  खऱ्या अर्थाने ज्योतीबांच्या सहधर्मचारिणी बनली.




महात्मा फुले यांनी स्त्रीशिक्षणाचे व अस्पृश्यांच्या शिक्षणाचे असिधाराव्रत हाती घेतले.पुरुषप्रधान व्यवस्था आणि शोशजन्य दरिद्र्य अशा दुहेरी दु:खाने पोळलेली क्षुद्र स्त्री ही फुलांच्या विचाराची केंद्रबिंदू होती.स्त्रियांना समाजातील दुय्यम स्थानामुळे नैसर्गिक मानवी अधिकारांना मुकावे लागले.ही जाणीव ज्योतीबांना होती.म्हणून ज्योतीबांनी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.सावित्रीबाई स्वतः तिथे शिक्षिकेचे कम करीत.



 बालविवाह,बहुपत्नीत्व,केशवपन,वेश्यागमन,पुन:विवाहप्रतिबंधक यासारख्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या रूढींवर फुलेंनी कठोर शब्दांत टीका केली. अविवाहित व परित्यक्त माता झालेल्या अनाथ महिलांसाठी आपल्याच  घरात त्यांनी महिलाश्रम काढला व त्या  नडलेल्या तरुणींना सावित्रीबाई मुलींसारखे सांभाळीत,त्यांनी काशीबाई नावाच्या विधवेला सांभाळले.तिला झालेल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले पुढे म्हातारपणी त्यानेच ज्योतिबा व सावित्रीबाई चा सांभाळ केला. 




ज्योतिबा फुले यांनी इ.स. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यात शुद्र व अतिशुद्र यांना आणून संघटीत केले.शुद्र,स्त्रिया,दलित,अस्पृश यांना सावकार,जमीनदार,व्यापारी.ब्राम्हण,मारवाडी यांच्या आर्थिक दास्यातून सुटका करायची होती.त्यासाठी त्यांची तळमळ होती.सत्यशोधक समाज व त्याच नावाचे वर्तमानपत्र ब्राम्हणाविरुद्ध आहे. अशी त्यांच्यावर टीका झाली पण या समाजाचे उदिष्ट भटभिक्षुकाच्या गरीब व अज्ञ लोकांच्या शोषण करणाऱ्या प्रवृत्तीवर टीका करण्याचे होते.परंतु ज्योतीबांनी ब्राम्हणाची चीड येऊन,त्यांनी सुशिक्षित ब्राम्हणोतोरांना लोकांनी महत्वाची धार्मिक कृत्ये करण्यास तयार केले.



त्यांचा संपूर्ण विचार हा समतेच्या तत्वावर आधारित  होता . १८८३ साली त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहिले.त्यात त्यांनी शेती व शेतकऱ्याच्या दीनवाण्या अवस्थेचे वर्णन केले आहे.शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या खचला आहे व भुकेला लागला आहे,त्याचे मर्मभेदक चित्रण त्यात आहे.शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला ब्रिटिशांनी संपूर्ण नोकरयंत्रना, काळे-गोरे,भट-सावकार कुलकर्णी जबाबदार असतात-असे त्यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विद्या व यंत्राद्वारे शेती करण्याची समज द्यावी.पशुपालन,शेतकऱ्यांच्या परीक्षा,स्पर्धा व बक्षिसे इ. उपायही त्यांनी सुचविले.





ज्योतीबांच्या मते,धर्म ही प्रत्येकाची वैयक्तित बाब आहे.त्यांच्या मते विशुद्ध धर्मभावना मानवी जीवनात ओतप्रोत भरून राहिली पाहिजे,त्यांना अभिप्रेत असलेला धर्म हा विश्वधर्म होता.त्यांना धर्मग्रंथ,रूढी,परंपरा यांचे निरपवाद प्रामाण्य मान्य नाही.त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचे उदिष्ट या पृथ्वीवरच ईश्वरी राज्याची स्थापना करणे,हे होते,त्यांना सर्व व्यक्तींचा एकाच वेळी विकास हवा होता.सर्वधर्मसमावेशक असा सत्यधर्माचा स्वीकार त्यांनी केला.बाम्हणाचे कसब,गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,सत्सार,हुशारा,सार्वजनिक सत्यधर्म,अखंडादी काव्यरचना ,तृतीय रत्न इ.त्याचे वाड्मय प्रसिद्ध आहे.धार्मिक गुलामगिरी विरुद्ध बंडाचे निशाण फडकविणाऱ्या फुलेंनी वेद,मूर्तीपूजा,चातुर्वर्ण्याव्यवस्था, पौराणिक या धार्मिक बाबींवर वैचारिक पातळीवर हल्ला चढविला.





त्यांनी विचारांना कृतिशिलतेचा  साथ दिली.जातीभेदांचे निर्मुलन,सामाजिक सामातेवरील भर, अस्पृश्यता निर्मुलन व बहुजानाव्दावारे या सत्यशोधक समाजाच्या तत्वावरूनच त्यांच्या कार्याची भव्यता पटते.यासाठी त्यांनी दाखवलेली निर्भिडता,नि:स्वार्थीपणा,सहनशीलता,बहुताही वाखण्यासारखी आहे.बहुजन समजाती जागृती,स्त्रीउन्नती.अस्पुशांचा झालेला कायापालट ही त्यांच्या सामाजिक कार्याची फलश्रुती म्हणावी लागेल.स्त्रिया,अस्पुश,शेतकरी यांच्यासाठी कार्य करत.
त्यांनी १८७३ साली पुणे येथे " सत्यशोधक समाजाची " स्थापना केली.त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली.





विद्येविना मती गेली |

मतीविना नीती गेली ||

नितीविना गती गेली |

गतीविना वित्त गेले ||

वित्तविना क्षुद्र खचले |




           इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

ही शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दिली.
             महात्मा फुले यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला.म्हणूनच लोकांनी त्यांना " महात्मा "  म्हणून गौरवले.

     दुर्दैवाने, २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला .



➤ राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली पुस्तके :-



  • नाटक (तृतीय रत्न)   इ.स. १८५५ 
  • पवाडा (छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा)  इ.स. १८६९ 
  • पुस्तक (ब्राम्हणांचे कसब) इ.स. १८६९ 
  • पवाडा (विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी)  इ.स.१८६९ 
  • अहवाल (सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत)
  • निबंध निवेदन 
  • पुस्तक (गुलामगिरी) इ.स.१८७३ 
  • अहवाल (पुणे सत्यशोधकसमाजाचा रिपोर्ट)  इ.स.१८७७ 
  • निबंध (पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वाक्तृव समारंभ) इ.स.१८८९ 
  • निवेदन (हंटर शिक्षण आयोगापुढे सदर केलेले निवेदन) इ.स.१८८२ 
  • पुस्तक (शेतकऱ्यांचा असूड) इ.स. १८८३ 
  • निबंध (महात्मा फुले यांचे मलबारीच्या दोन टिपनाविषयी चे मत) इ.स. १८८४ 
  • पत्र (मराठी गंथागार सभेचे पत्र) इ.स. १८८५ 
  • पुस्तक ( सत्सार अंक १) इ.स. १८८५ 
  • पुस्तक (सत्सार अंक २) इ.स.१८८५ 
  • पुस्तक (इशारा) इ.स. १८८५ 
  • जाहीर प्रकटन (ग्राम्जोश्यासं बंधी जाहीर खबर ) इ.स. १८८६ 
  • पत्र (मामा परमानंद यांस पत्र)   इ.स.१८८६ 
  • पुस्तक (सत्यशोधक सामाजोक्त मंगलअष्टका सह सर पूजा-विधी) इ.स.१८८७ 
  • काव्यरचना (अखंदाडी काव्य रचना ) इ.स. १८८७ 
  • मृत्यु पत्र (महात्मा फुले याचे उईलपत्र ) इ.स.१८८७ 
  • पुस्तक ( सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक ) इ.स. १८९१ (प्रकाशन )




महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यु कसा झाला :-

       

  ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी एका विधवेचे मूल दत्तक घेतले. हा मुलगा मोठा होऊन डॉक्टर झाला आणि त्यानेही आपल्या आई-वडिलांचे समाजसेवेचे कार्य पुढे नेले. ज्योतिबांनी मानवतेसाठी केलेल्या या नि:स्वार्थ कार्यांमुळे मे १९८८ मध्ये त्या काळातील आणखी एक महान समाजसुधारक "राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर" यांनी त्यांना "महात्मा" ही पदवी दिली. जुलै 1988 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांचे शरीर अशक्त होत चालले होते परंतु त्यांचे मन आणि आत्मा कधीच कमजोर झाले नव्हते.

 

         27 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांनी आपल्या सर्व हितचिंतकांना बोलावून सांगितले की "आता माझी जाण्याची वेळ आली आहे, मी आयुष्यात घेतलेली सर्व कामे मी पूर्ण केली आहेत, माझी पत्नी सावित्री नेहमीच सावलीसारखी मला साथ देते. "आणि माझा मुलगा यशवंत अजून लहान आहे आणि मी दोघांनाही तुझ्या स्वाधीन करतो. असे म्हणताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि पत्नीने त्यांना सांभाळले. ज्योतिबा फुले यांनी 28 नोव्हेंबर 1890 रोजी देह सोडला आणि एक थोर समाजसेवक या जगाचा निरोप घेतला.




➽ महात्मा ज्योतीबाबद्दल काही महत्वाचे प्रश्न :-



१. ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय ?

 उत्त्तर :  सावित्रीबाई फुले 


२.ज्योतिबा फुले यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय ?

 उत्तर : वडील - गोविंदराव फुले व आई - चिमणाबाई फुले 


३. ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा व  कुठे झाला ?

उत्तर :  ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यांतील कटगुण येथे झाला


४ .ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा केव्हा व  कुठे काढली  ?

उत्तर :  ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुणे येथे 



५.ज्योतिबा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता   ?

उत्तर :  " शेतकऱ्यांचे आसूड "



















To Top