➲ संत एकनाथ महाराज :-
नाव : संत एकनाथ
जन्म : इ.स.१५३३
जन्म ठिकाण : पैठण,महाराष्ट्र
वडील : सूर्यनारायण
आई : रुख्मिणी
अपत्य : गोदावरी,गंगा,आणि हरी.
पत्नी : गिरीजा
गुरु : सद्गुरू जनार्दन स्वामी
धर्म : हिंदू
मूत्यू : २६ फेब्रुवारी १५९९
|
संत एकनाथ महाराज |
संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चलावली.ते पैठणचे राहणारे.त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला.अभंग,ओव्या व भारुडे लिहिली.कोणत्याही उच्चनीच भेतभाव मानू नका,असा त्यांनी लोकांना उपदेश केला.भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला.गोरगरिबांना,मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले.इतकेच नाही,तर मुक्या प्राण्यांवरदेखील त्यांनी दया केली.प्राणीमात्रावर दया करा,असा लोकांनाही उपदेश केला.संत एकनाथ असे बोलत तसे वागत.ते सर्वांशी सारख्याच प्रेमाने वागत.पशु ,पक्षी, माणसे ही सारी देवाचीच लेकरे असे त्यांना वाटत असे.
एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते.दुपारची वेळ होती.ऊन रखरखत होते.वाळवंत तापले होते.त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते.त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला.त्यांनी त्याचे त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडेतिकडे पहिले.धावत ते त्या मुलाजवळ गेले,त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले.त्याचे डोळे पुसले.त्याला त्याच्या घरी सुरक्षित पोहोच केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची बिंबवली.
👉संत एकनाथ महाराजांचे अप्रतिम अभंग :-
⇨ संत एकनाथ महाराजांचे अभंग :-👇
👉संत एकनाथांची एक छोटीही कथा :-
एकदा महाराज काशीहून गंगेची कावड घेऊन रामेश्वराला जात होते.त्यांचा शिष्य उद्धव व इतर मंडळी त्यांच्याबरोबरच होती.हे सारे जन मजल दरमजल करीत रामेशावाराजवळ पोहचले.आता रामेश्वर काही फारसे दूर नव्हते .' आता नाथ लवकरच रामेश्वरास पोहोचतील.तेथे जाताच रामेश्वराला गंगाजळाने अभिषेक करतील.सगळ्यांची यात्रा पुरी होईन .' या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
ते उन्हाळ्याचे दिवस होते,दुपारची वेळ होती, ऊन मी म्हणत होते.आजूबाजूला रखरखीत वालवंट पसरलेले होते.अशा त्या वाळवंटात एक गाढव तडफडत असलेले नाथांना दिसले.ते तहानेने व्याकूळ झालेले होते.त्या वाळवंटात त्याला कोठून मिळणार? महराजांना त्याची दया आली.त्याची तडफड त्यांना पाहेवेना.ते लगेच त्याच्या जवळ गेले.त्यांनी खांद्यावरील कावड खाली ठेवली.कावडीतील गंगाजळाने रामेश्वराला ते अभिषेक करणार होते.तेच गंगाजळत्यांनी त्या तडफडणाऱ्या मुक्या प्राण्याला मोठ्या मायेने पाजले !
गाढवाची तहान भागली.त्याला हुशारी वाटू लागली.ते उठून उभे राहिले.महाराजांना ते पाहून किती समाधान वाटले! त्याच्या पाठीवरून ते प्रेमाने हात फिरवू लागले,हे सारे महाराजांचा शिष्य उद्धव व इतर लोक यांनी पहिले.ते महाराजांना म्हणाले -
" महाराज, हे हो काय केलंत ? आपणाला या गाढवाचा विटाळ झाला ! सारं गंगाजळ अपवित्र झाला! आता रामेश्वराला जाण्यास काय अर्थ उरला ? अगदी थोडक्यासाठी आपली सारी यात्रा वाया गेली!"
महाराजांच्या बरोबरीची सर्व माणसे नाराज दिसत होती.महाराज मात्र शांत होते .त्यांच्या मुखावर आनंद दिसत होता.ते म्हणाले " बाबांनो, या मुक्या प्राण्याला तडफडून कसं मारू द्यायचं? मग रामेश्वरी जाऊनही आपली यात्रा पुरी कशी झाली असती!"
हे एकूण एक जण पुढे येऊन म्हणाला," महाराज,हे असं कसं म्हणता ?"
महाराज त्याला समजावत म्हणले," बाबा रे,देव सर्वत्र आहे.कोणत्या रुपानं तो आपल्याला भेटेल,हे कुणी सांगावं? या प्राण्याला पाण्याशिवाय मारू दिल असतं तर देवाला तरी आवडलं असतं का? गंगाजळ पाजून आपण त्याला जगवलं,त्यातच आपली यात्रा सफल झाली!"
असे होते संत एकनाथ महाराज,म्हणूनच संत निळोबाराय म्हणतात -
" धन्य धन्य एकनाथा !
तुमचे चरणी माझा माथा !!"
|| संतवाणी ||
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल |
कानडा विठ्ठल विटेवरी || १ ||
कानडा विठ्ठल नामें बरवों
कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा || २ ||
कानडा विठ्ठल रूपे सावळां |
कानडा विठ्ठल पाहिला डोळां || ३ ||
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी |
कानडा विठ्ठल पहावा उठाउठी || ४ ||
कानडा विठ्ठल कानडा बोले |
कानडा विठ्ठलें मन वेधियेलें || ५ ||
वेधियेलें मन कानड्याने ं माझें |
एका जनार्दनीं दुजें नाठवे चि || ६ ||
- संत एकनाथ
⇨ संत
एकनाथ महाराजांचे कार्य :-
संत
एकनाथांनी भागवत पुराण त्यांच्याच भाषेत लिहिले. त्यांनी या ग्रंथाला "एकनाथी
भागवत" असे नाव दिले - एकनाथी भागवत. वेगवेगळ्या शब्दांत रामायण लिहून
त्यांनी भावार्थ रामायणाचा नवा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी "रुक्मिणी
स्वयंवर" - रुक्मिणी स्वयंवर ही रचना केली आणि त्यात एकूण ७६४ ओव्या होत्या.
हा ग्रंथ शंकराचार्यांच्या 14 संस्कृत श्लोकांवर आधारित आहे.
शुकाष्टक
,स्वात्मा-सुख,आनंद-लहरी, चिरंजीव पद, गीता सार आणि प्रल्हाद विजय यांसारखे
ग्रंथ संत एकनाथांनी लिहिले. त्यांनी मराठीत 'भारुड' (एकनाथमहाराज भारुड) नावाचे नवीन गाणे रचले. ही
एक अतिशय प्रसिद्ध गाण्याची रचना आहे.
संत
एकनाथांचे चरित्र वाचल्यावर ते समाजात चालत आलेल्या जुन्या परंपरेच्या विरोधात
होते हे कळते. ते सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना समान मानत. त्यांनी केवळ लोकांना
चांगला मार्ग दाखवला नाही तर सर्व लोकांचे कल्याण व्हावे म्हणून ग्रंथ आणि
ग्रंथांची रचना केली.
👉संत एकनाथा बद्दल काही प्रश्न :
१. संत एकनाथांचा पहिला ग्रंथ कोणता ?
उत्तर - "भागवत "
२. संत एकनाथांनी भागवत या ग्रंथात किती ओव्यांचा समावेश आहे ?
उत्तर - " संत एकनाथ यांचा हा १८,७९८ ओव्यांचा ग्रंथ आहे."
३. संत एकनाथांनी १२५ विषयांवर किती भारुडांची रचना केली ?
उत्तर - " १२५ विषयांवर सुमारे तीनशे भारुड त्यांनी रचले "
४. भारुड म्हणजे काय ?
उत्तर - " भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे"
५. सद्गुरू जनार्दन स्वामी ( संत एकनाथांचे गुरु ) यांचे गाव कोणते ?
उत्तर - "चाळीसगाव"