➲ श्री.समर्थ रामदास स्वामी :-
नाव : नारायण सूर्याजीपंत ठोसर
जन्म: २४ मार्च १६०८
गाव : जांब
ठिकाण : जालना,महाराष्ट्र
वडील : सूर्याजीपंत ठोसर
आई : राणूबाई ठोसर
गुरु : प्रभू श्रीरामचंद्र
भाषा : मराठी
मृत्यू : १३ जानेवारी १६८१
|
समर्थ रामदास स्वामी |
संत रामदास हे महाराष्ट्राचे थोर संतकवी होते.
त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत " जय जय रघुवीर समर्थ " अशी रामदासांची गर्जना घुमत होती.त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला.रामदासांचे मूळ नाव नारायण ,व ते स्वतःला 'रामाचा दास' म्हणू लागले.'दासबोध' या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला.राणूबाई हे त्यांच्या आईचे नाव तर सुर्योजीपंत हे त्यांच्या वडिलांचे नाव होते.
तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली.बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले."सामर्थ्य आहे चळवळीचे ,जो जो करील तयाचे",हा संदेश त्यांनी लोकांना दिला.रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली.त्यामुळे त्या काळात लोकांना धीर आला.
⟹ समर्थ
रामदासांचे त्याग :-
वयाच्या
12 व्या वर्षी नारायणच्या आई-वडिलांना त्याचं
लग्न करायचं होतं पण या लग्नामुळे तो अजिबात खूश नव्हते . त्याला कुठे जायचे आहे
हे त्याला माहीत होते. लग्नाच्या दिवशी तो मंडपातून पळून गेला त्यानंतर ते घरी परतलेच नाही. त्यांनी महाराष्ट्रातील
नाशिकजवळील टाकळी नावाचे ठिकानी राहू लागले, त्यांनी 12 वर्षे ते मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या
उपासनेत गुंतले. त्यावेळी ते स्वतःला रामाचा सेवक म्हणायचे, म्हणूनच त्यांचे नाव "रामदास" होते.
12 वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर
त्यांना रामाचे दर्शन झाले. जेव्हा त्याला साक्षात्कार झाला तेव्हा ते फक्त 24 वर्षांचा होते. त्यानंतर ते पुढील बारा
वर्षांच्या भारत दौऱ्यावर निघाले.
➡ संत
रामदासांची तीर्थयात्रा आणि भारत दौरा:-
आत्मसाक्षात्कार झाल्यावर समर्थ रामदास
तीर्थयात्रेला निघाले. 12 वर्षे ते भारताचे दौरे करत राहिले.
हिंडत फिरत ते हिमालयात आले. हिमालयातील पवित्र वातावरण पाहून रामदासजींच्या मनात
मुळातच अलिप्त निसर्ग जागृत झाला. आता आत्मसाक्षात्कार झाला, भगवंताचे दर्शन झाले, मग हा देह धारण करण्याची काय गरज?असा विचार त्याच्या मनात आला. त्याने 1000 फुटांवरून मंदाकिनी नदीत झोकून दिले.
पण त्याच वेळी प्रभुरामांनी त्याला वर
उचलून धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली. त्यांनी धर्मासाठी देह अर्पण करण्याचा
निर्णय घेतला. तीर्थयात्रेवर असताना ते श्रीनगरला आले. तेथे त्यांची भेट शीखांचे
गुरु हरगोविंद जी महाराजांशी झाली. गुरू हरगोविंद जी महाराजांनी त्यांना
धर्मरक्षणासाठी सशस्त्र होण्याचे मार्गदर्शन केले.
👉संत नामदेव महाराजांचे अप्रतिम अभंग :-
➥ संत नामदेव महाराजांचे अभंग :-👇
समर्थांचे मुल नाव नारायण,ते बालपणापासूनच अध्यात्मिक गुणांचे आणि विरक्त स्वभावाचे होते.श्री. समर्थ रामदास स्वामींचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ रूपांनी आजही त्यांचे विचार मनुष्य जातीत वास करतात.श्री गणेशाची आराधना करतांना घरोघरी म्हंटली जाणारी आरती " सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची " ही सुद्धा समर्थांचीच रचना.त्यांचे " मनाचे श्लोक " हे मानवाच्या मनाला उद्देशून केलेले सूक्ष्म विचार माणसाला अंतबार्ह्य बदलू शकतो.
१२ वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी भारत भ्रमण केले.अवधा हिंदुस्थान ते फिरले.छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते.स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी समर्थांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केल्याचे पुरावे आढळतात.महाराजांनी समर्थांनी काही गावे इनाम म्हणून देखील लिहून दिल्याचे पुरावे आहेत. संत रामदास स्वामींनी माघ वद्य नवमीला सज्ज्यगडावर आपला देह ठेवला.
संत रामदास स्वामींनी गोवोगावी मारुतीची देवळे बांधली,त्यात समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे हे सातारा,चाफळ,सज्जनगड या परिसरात आहे. या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. संत रामदास स्वामींचा देह सज्जगडावर आहे.
संत रामदास स्वामींनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे पुढीलप्रमाणे आहेत :-
१. दास मारुती, चाफळ (श्रीराम मंदिरासमोर )
२.खडीचा मारुती,शिंगणवाडी,चाफळ ( डोंगरावर)
३.वीर मारुती,चाफळ (श्रीराम मंदिरामागे)
४.प्रताप मारुती ,माजगाव,चाफळ
५.उंब्रज मारुती ( कराड )
६.शहापूर मारुती ( उंब्रज जवळ )
७.मसूर मारुती ( कराड )
८.बहे-बोरगाव ( कृष्णामाई ) मारुती ( सांगली )
9.शिराळा मारुती ( बत्तीस शिराळा,सांगली)
10.मनपाडळे मारुती ( कोल्हापूर )
११.पारगाव मारुती ( कोल्हापूर ) .
👉संत रामदास स्वामी बद्दल काही प्रश्न :-
१.संत रामदास स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर -" दासबोध"
२.संत रामदास स्वामी यांची समाधी कुठे आहे ?
उत्तर - "सज्जगडावर"
३. संत रामदासाच्या श्लोकांची एकूण संख्या किती आहे ?
उत्तर - " २०५ "
४. समर्थ रामदासांनी दासबोधात कोणता संदेश दिला ?
उत्तर - " समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख माणसाची आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगितले आहेत.
५. संत रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते का ?
उत्तर - " समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं ,त्याच त्यांच्या गुरु होत्या.