➲ संत ज्ञानेश्वर महाराज :-
नाव : ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माउली)
जन्म : २२ ऑगस्ट ११९७
गाव : आपेगाव
ठिकाण : पैठण,महाराष्ट्र
वडील : विठ्ठलपंत कुलकर्णी
आई : रुक्मिणीबाई कुलकर्णी
बहिण : मुक्ताबाई
भाऊ : निवृतिनाथ व सोपानदेव
गुरु : श्री.संत निवृत्तिनाथ महाराज
शिष्य : साचिदानंदा महाराज
भाषा : मराठी
ग्रंथ : " ज्ञानेश्वरी "
|
संत ज्ञानेश्वर महाराज |
" आता विश्वात्मके देवें , येणे वाग्यज्ञे तोषावें !
तोषोनि मज द्यावे , पसायदान हे !! "
अखिल विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणारे महान संत म्हणजेच संत ज्ञानेश्वर होय.
संत ज्ञानेश्वर हे अपेगावाचे राहणारे.निवृत्तिनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू होते.मुक्ताबाईं ही त्यांची बहिण होती.त्यांच्या आईचे नाव रुख्मिणीबाई तर वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे होते.त्यांची चार अपत्य म्हणजेच -संत निरुत्तीनाथ,संत ज्ञानदेव ( संत ज्ञानेश्वर ), संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई होय.
आई वडिलांच्या मृत्युनंतर समाजाने या मुलांना वाळीत टाकले,अमानुष अत्याचार केले.हे सर्व सहन करतच मुळे मोठी झाली.सर्वामध्ये सहनशीलता,सत्यवचनीपणा आणि सदाचारीवृत्ती अतिशय खच्चून भरली होती.आपले वडील बंधू निरुत्तिनाथ यांना संत ज्ञानेश्वर यांनी गुरु मानले होते.त्यांच्या आज्ञेनुसार भगवतगीतेचा बोध व्हावा म्हणून त्यांनी "ज्ञानेश्वरी " हा ग्रंथ लिहिला.यानंतर ज्ञानदेवांनी अमृतानुभव लिहिण्यास घेतला.अमृतानुभव लिहिल्यानंतर इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी येथे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली.
त्या वेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाशी मुले म्हणून नावे ठेवत,त्याचे कारण असे -त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता.घर सोडले होते,पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते घरी परत आले आणि संसार सुरु करू लागले. पुढे त्यांना ही चार मुळे झाली.हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते.लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते.लोक त्या मुलांचा छळ करत होते.संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतिक होते
" ज्ञानसूर्य "संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.त्यामध्ये ८०० ओव्या त्यांच्या प्रतिभेची खोली व्यक्त करतात.संत ज्ञानेश्वरांनी असे संपन्न व प्रव्यक्ष अनुभूतिसंपन्न अभंग हरिपाठाची रचना करून मराठीचा अभिमान वाढवला.ज्ञानेश्वरांनी हरिपाठ हा उत्कृष्ट ईश्वरी नाम स्मरणाचा नाम पाठ आहे.ज्ञानेश्वरांनीच्या शेवटच्या अध्यायांत ज्ञानदेवांनी विश्वकल्यानासाठी प्रार्थना अर्थात पसायदान लिहिले.संत ज्ञानेश्वरांनी कोणत्याही रचनेत त्यांच्या कुटुंबावर समाजाने केलेले अत्याचार जाणवत नाहीत.
ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले;पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही.सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले.त्यांच्या बालमनाला खूप दु:ख झाले.ते आपल्या झोपडीत आले.झोपडीचे दार बंद करून आत दु:ख करत बसले.इतक्यात तेथे मुक्त आली.गवताच्या ताटीवर टिचक्या मारत टी ज्ञानेश्वरांना म्हणाली,"ताटी उघडा ज्ञानेश्वरा.अहो,आपण दु:खी कष्ठी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील ?" बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला.दु:ख विसरून ते कामाला लागले.ठिकठिकाणी गोरगरीबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता.तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला, "ईश्वरावर श्रद्ध ठेवा.सगळ्यांशी समतेचे वागा.दु:खी मानासांना मदत करा,त्यांचे दु:ख नाहीसे करा."त्यांचा उपदेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत होता.
त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंधिस्त झाले होते.सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती.ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून "ज्ञानेश्वरी" हा फार मोठा ग्रंथ लिहिला.धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले.लोकांना बंधुभावाची शिकवण दिली.ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी - कार्तिकीला आळंदी - पंढरीला जातात.
संत
ज्ञानेश्वरजींनी आपल्या ग्रंथात 10000 हून अधिक श्लोक रचले आहेत.
यामुळेच ते संपूर्ण भारत देशाचे महान संत आणि महान कवी मानले गेले. संत
ज्ञानेश्वरजी जेव्हा १५ वर्षांचे होते तेव्हा ते भगवान श्रीकृष्णाचे महान उपासक
बनले होते. जेव्हा संत ज्ञानेश्वरजींनी त्यांच्या मोठ्या भावाकडून शिक्षण घेतले
तेव्हा त्यांनी अवघ्या 1 वर्षाच्या आत एका महाकाव्यावर
लेख लिहायला सुरुवात केली आणि ते महाकाव्य होते भगवत गीता. या महाकाव्याला त्यांनी
स्वतःच्या नावाने नाव दिले व त्याला ज्ञानेश्वरी असे नाव दिले, हा ग्रंथ सध्याच्या काळात अतिशय
प्रसिद्ध असून त्यांनी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला.
ज्ञानेश्वरी
हा मराठी भाषेतील सर्वात आवडता ग्रंथ मानला जातो, या पुस्तकात त्यांनी 10000 हून अधिक श्लोक वापरले आहेत. संत
ज्ञानेश्वर जी 1296
साली
वारली, म्हणजे 21 वर्षांचे असताना त्यांचे निधन
झाले, परंतु काही लोक म्हणतात आणि
मानतात की संत ज्ञानेश्वरजींनी जगाचा भ्रम सोडून समाधी घेतली आहे. आळंदीतील
सिद्धेश्वर मंदिरात संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. ते समाजसुधारक आणि श्रेष्ठ कवी
होते.
👉संत ज्ञानेश्वरांचे प्रसिद्ध अभंग :-
⇰ संत
ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन :-
अनेक संकटे आणि संघर्षानंतर संत
ज्ञानेश्वरजींचे थोरले बंधू निवृत्तीनाथ जी गुरु गैनीनाथांना भेटले. ते त्यांचे
वडील विठ्ठलपंतजी यांचे गुरू होते, त्यांनी निवृत्तिनाथजींना योगमार्गाची
दीक्षा आणि कृष्णाची उपासना करण्याचा उपदेश केला, त्यानंतर
निवृत्तीनाथजींनी त्यांचे धाकटे भाऊ ज्ञानेश्वर यांनाही दीक्षा दिली.
यानंतर संत ज्ञानेश्वर आपल्या भावासह प्रख्यात
विद्वान आणि पंडितांकडून शुद्धी घेण्याच्या उद्देशाने पैठण या मूळ गावी पोहोचले.
त्याचवेळी दोघेही बरेच दिवस या गावात राहिल्याने त्यांच्या या गावात राहिल्याच्या
अनेक चमत्कारिक कथाही प्रचलित आहेत.
पुढे संत ज्ञानेश्वरजींची चमत्कारिक शक्ती
पाहून गावातील लोक त्यांचा आदर करू लागले आणि पंडितांनीही त्यांना शुद्धीपत्र
दिले.
➪ संत ज्ञानेश्वर महाराज अभंगवाणी :- 👇
➥ संत ज्ञानेश्वरांचा
मृत्यु :-
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, इ.स.
१२९६ मध्ये, भारताचे महान संत आणि प्रसिद्ध मराठी कवी संत ज्ञानेश्वर जी यांनी सांसारिक
आसक्ती सोडून समाधी घेतली. त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे.
त्याच वेळी, त्यांची शिकवण आणि त्यांनी रचलेल्या महान पुस्तकांसाठी ते आजही स्मरणात आहेत
👉संत ज्ञानेश्वराबद्दल काही महत्वाचे प्रश्न :-
१. संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ ?
उत्तर- " ज्ञानसूर्य "
२. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिला ?
उत्तर - " अहमदनगर जिल्ह्यांतील नेवासे गावात "
३. ज्ञानेश्वरीचे दुसरे नाव ?
उत्तर - "माउली"
४. संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते ?
उत्तर - संत निवृत्तिनाथ महाराज ( संत ज्ञानेश्वरांचे स्वतःचा मोठा भाऊ हे त्यांना गुरु मानत)
५. संत ज्ञानेश्वरांनी समाधी का घेतली ?
उत्तर - संत ज्ञानेश्वरांनी समाधी का घेतली हे अजून कोणालाही माहित नाही,हे त्यांनी कोणत्याही ग्रंथात लिहिले नाही.