सावित्रीबाई फुले माहिती | Savitribai Phule Information In Marathi

 


सावित्रीबाई फुले :-


नाव :  सावित्रीबाई ज्योतीराव फुले 

जन्म :  ३ जानेवारी इ.स. १८३१ 

वडील :  खंडोजी नेवसे 

आई :  सत्यवती नेवसे 

पती :  ज्योतीराव फुले 

धर्म :  हिंदू 

पुरस्कार : " क्रांतीज्योती "

जन्म ठिकाण : नारायण,सातारा ,महाराष्ट्र

मृत्यु :  10 मार्च इ.स. १८९७ ( पुणे ,महाराष्ट्र )





सावित्रीबाई फुले 




ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाज सेविका होत्या.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरच सावित्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री - शिक्षणाच्या त्या आध्य क्रांतिकारक होत्या.पुण्यात स्त्री - शिक्षणाची सोय नव्हती.तेव्हा ज्योतीबांनी इ.स. १८४७ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षकही मिळत नसत.तेव्हा ज्योतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.



सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यांतील नायगाव या गावी झाला.वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला.सावित्रीबाईंना ज्योतीराव फुले यांच्या रूपाने एक सुरक्षित,समाजहितवादी,परोपकारी व समंजस पती लाभले.त्या काळी समाजात बालविवाह,सतीप्रथा,जातीभेद.अंधश्रद्धा इ. वाईट प्रथा रूढ होत्या,त्या दूर करण्यासाठी ज्योतीरावांनी समाजाला शिक्षित करण्याचे ठरवले.यासाठी प्रथम सावित्रीबाईना शिक्षण देण्याचे धाडसी पावूल त्यांनी उचलले.




सावित्रीबाईंना स्वतः चे अपत्य झाले नाही,पण सर्व दिनदलीतांना व अनाथांना त्यांनी जवळ करून त्यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक दु:खापासून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा थेंब व श्रण वेचला.सावित्रीबाईनी आपल्याला मुल ण झाल्यामुळे  ज्योतीबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला,पण ज्योतीबांवर त्याचा काही परिणाम झाला नाही.कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते.सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.सर्वटीका करून एका थोर समाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून धैर्याचे वागून ज्योतीबांचे जीवन धन्य करण्यास त्यांना सर्व तोपरी सह्या केले.सावित्रीबाईना उत्तम शिक्षण मिळाले .ज्योतिबा फुले  सावित्रीबाई चे शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या पवित्र कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न ज्योतीबांच्या वडिलांना असे वाटले कि,यांच्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे धर्माला कळिमा लागेल ४२ पिढ्या नरकात जातील.पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत,ज्योतीबांनी स्त्री शिक्षण चळवळीचे नेते होते.




त्यांच्या मुलींच्या शाळेत,मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली.पुण्यामध्ये त्या काळात हे कार्य म्हणजे एक चर्चेचा विषय झाला होता.पण आपल्या कार्यामुळे ज्योतिबा व सावित्रिबाईनी एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता.सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता.संत चोखामेळा मंदिरात सावित्रीबाईनी महार,मांग,कुणबी इ. लोकांच्या मुलींसाठी शाळा काढली.त्यांच्या सेवावृत्तीने केलेल्या कामाचा गौरव इंग्रज सरकारने पुण्याला विश्रामबागवाड्यात केला.स्त्री - शिक्षकेचा हा गौरव होता.असा मन आतापर्यंत कोणालाही मिळाला नव्हता. 




सावित्रीबाईनी जे विचार मांडले,ते प्रत्यक्ष कृतीत आणले.शाळेमध्ये सावित्रीबाई मुख्याध्यापिका त्या पवित्र ध्येयाने अध्यापनाचे काम करीत.सावित्रीबाईचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व सनातन्यांनी केला.तसाच शारीरिक छळ करण्याचा विचारही काहींनी केला.
रस्त्यातून जात असतांना एखादी कर्मठ बाई शिव शिव करीत,तिच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारी.त्या शेणाची घाण, सावित्रीबाई न रागावता स्वच्छ करीत.थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी भगिनी झडलेला कचरा माडीवरून त्यांच्या अंगावर पडेल, अशा बेताने टाकीत.तेव्हा हसून म्हणत, बरे झाले बाई , तुम्ही ही फुले टाकलीत, ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला. ही फुले मला माझ्या विद्याथ्यांनींना शिकविण्यासाठी उत्तेजन देतील.आणि ती भरभर शाळेकडे निघून जाई .एखादा शाळेकडे जातांना, चौकात चार-पाच गुंड मुळे बसली होती. सावित्रीबाई तिथे आल्यावर त्यांच्यापैकी एकजण पुढे येऊन म्हणाला, मुलींना आणि महार मागांना शिकविणे तू बंद कर , नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही, हे शब्द ऐकताच त्या गुंड मुलाला तिने ताड ताड अशा तीन मुस्कटीत ठेऊन दिल्या तो गुंड मुलगा गाल चोळतच राहिला. अशा संकटाना तोंड देण्यास सावित्रीबाई समर्थ होत्या, तरी ज्योतीरावांनी एक पट्टेवाला त्यांच्यासोबत दिला . ज्योतीरावांनी काढलेल्या सर्व शाळांचा खर्च ते पदरमोड करून करीत असत.






दादोबा पाडुरंग तर्खडकर हे सरकारी देशी मुलांचे पर्यवेषक असतांना, त्यांनी इतक्या थोड्या वेळात शाळेने चागली प्रगती केली, हे त्या चालकांना भूषणावह आहे, असा शेरा दिला होता. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे, कारण विधवा स्त्रीने संन्यासिसारखे जीवन जगावे , अशी रूढी होती, तिला अपशकुनी समजले जाई. तिला पांढरे वस्र परिधान करून घरातच कोंडून ठेवले जाई. सावित्रीबाईनी स्त्रियांचे हे दु:ख जवळून पहिले . केशवपनाची दृष्ट रूढी नष्ठ झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले. परंतु लोक ऐकेनात. तेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाईनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलाविली आणि आपण आपल्या भगिनीवर वस्तरा चालवितो हे केवढे पाप आहे, याची जाणीव त्यांना करून दिली वं त्यांना केशवपनास जाऊ नका असे सांगितले. न्ह्याव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला. तो खूप गाजला.



सावित्रीबाईनी बालहत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरु केले. बालविधवांचे दु:ख त्यांनी जाणले.भ्रणहत्येचा प्रकार रोजच घडत आहे ,असे त्यांनी पहिले. विधवांसाठी सुरक्षितपणे बाळंतपण व्हावे, म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या. 
अस्पुश्यांसाठी ज्योतीबांनी पाण्याचे हौद खुले केले, त्यात सावित्रीबाई चा वाटा फार मोठा होता. इ.स. १८८३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते.त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. तेव्हा त्यांनी आपले विचार  परखडपणे मांडले.




सावित्रीबाई चा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह १८९० साली प्रसिद्ध झाला. 10 मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईनाही प्लेगने घेरले.आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला, स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषा इतकेच काम करू शकते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिद्ध करून दाखवले.







👉सावित्रीबाई फुले यांची प्रसिद्ध पुस्तके :-

  • बानवकशी
  • ज्योतीबांची भाषणे
  • सुबोध रत्नाकर 
  • सावित्रीबाईची गाणी 
  • काव्यफुले



सावित्रीबाई फुले यांचे लग्न आणि शिक्षण :-


पूर्वीच्या काळी जेव्हा समाजातील लोक स्त्रियांची लग्ने अगदी लहान वयात करत असत, कारण त्यांचा असा विश्वास होता की लग्न जितक्या लवकर झाले तितके चांगले, असेच काहीसे सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत घडले होते, त्यांचेही लहानपणीच लग्न झाले होते. 1840 साली वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर लगेचच ती पतीसोबत पुण्याला शिफ्ट झाली. त्यांची शिक्षणाची ओढ काही वेगळीच होती. लग्नाच्या वेळी तिचे शिक्षण झाले नव्हते, पण तिची अभ्यासातील आवड पाहून ज्योतिबा फुले यांनी त्यांना पुढे लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाईंनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेतले आणि त्या पात्र शिक्षिका झाल्या.



  मुलींसह पहिली महिलांसाठी शाळा :-

3 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या पतीसह विविध जातीतील नऊ विद्यार्थिनींसह पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा स्थापन केली. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी एका वर्षात पाच नवीन शाळा सुरू केल्या. तत्कालीन सरकारनेही त्यांचा गौरव केला. 1848 मध्ये मुलींची शाळा चालवणे एका महिला प्राचार्याला किती कठीण गेले असेल, याची कल्पना आजही करता येणार नाही. त्यावेळी मुलींच्या शिक्षणावर सामाजिक बंधने होती. सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात केवळ स्वतःचा अभ्यास केला नाही तर इतर मुलींच्या शिक्षणाचीही व्यवस्था केली.


सन्मान :-
 
           ३ जानेवारी २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्म दिनानिमित्त त्यांचे " गुगल डूडल " हा प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले.




महिलांना हक्क मिळवून दिले :-


देशातील विधवांच्या दुरवस्थेने सावित्रीबाईंनाही खूप वेदना होत होत्या. म्हणून 1854 मध्ये त्यांनी विधवांसाठी निवारा उघडला. अनेक वर्षांच्या निरंतर सुधारणांनंतर, 1864 मध्ये एका मोठ्या आश्रयामध्ये रूपांतरित करण्यात सक्षम झाले . कुटुंबाने सोडून दिलेल्या निराधार महिला, विधवा आणि बाल सुनांना या निवारागृहात स्थान मिळू लागले. सावित्रीबाई या सर्वांना लिहून शिकवत असत. या संस्थेत आश्रय घेतलेल्या विधवेचा मुलगा यशवंतरावांनाही त्यांनी दत्तक घेतले. त्याकाळी दलित व नीच जातीच्या लोकांना विहिरीचे पाणी आणण्यासाठी सर्वसामान्य गावांत जाण्यास मनाई होती. या गोष्टीचा त्यांना आणि तिच्या पतीला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांनाही सहज पाणी मिळावे म्हणून तिने पतीसोबत विहीर खोदली. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला होता.



सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रसिद्ध प्रकाशित कार्यक्रम व साहित्य :-


  • सावित्रीबाई फुले ( लेखक - अभय सदावर्ते )
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ( लेखिका - उषा पोळ- खंदारे )
  • कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले ( लेखिका - डॉ. किरण नागतोडे )
  • सावित्रीबाईचा  संघर्ष ( के.डी. खुर्द )
  • सावित्रीबाई फुले ( लेखक - जी.ए.उगले )
  • सावित्रीबाई फुले ( लेखक - डी.बी. पाटील )
  • सावित्रीबाई फुले चरित्र ( लेखक - बा.ग. पवार )
  • सावित्रीबाई फुले -श्रद्धा ( लेखक - मोहम्मद शाकीर )
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास ) ( लेखक - ज्ञानेश्वर धानारेकर ) 
  • युगस्त्री : सावित्रीबाई फुले ( विठ्ठल लांजेवार )
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ( सौ. सुद्धा पेठे )





👉सावित्रीबाई फुले यांचा मृत्यु :-
 
 
 10 मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईनाही प्लेगने घेरले.आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला, स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषा इतकेच काम करू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

 

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यु कसा झाला ?


सावित्रीबाईंचे दत्तक पुत्र यशवंतराव डॉक्टर म्हणून लोकांची सेवा करू लागले. 1897 मध्ये बुबोनिक प्लेगच्या साथीने महाराष्ट्रातील  आजूबाजूच्या परिसरावर वाईट परिणाम झाला, तेव्हा धैर्यवान सावित्रीबाई आणि यशवंतरावांनी पुण्याच्या बाहेरील भागात या रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी क्लिनिक उघडले. तिचा मुलगा त्या रूग्णांवर उपचार करायचा त्या क्लिनिकमध्ये सावित्रीबाई फुले या साथीच्या आजाराला बळी पडलेल्यांना घेऊन यायच्या. रुग्णांची सेवा करत असताना त्या स्वतः या आजाराला बळी पडली. १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले.



👉सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न :-



१. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतीबांशी केव्हा झाला ?

 उत्तर-  इ.स.१८४० 


२. सावित्रीबाई फुले यांच्या आई चे व वडिलांचे नाव  

उत्तर - आई - सत्यवती नेवसे , वडील -  खंडोजी नेवसे 



३.  सावित्रीबाई फुले यांना Google ने कोणता सन्मान दिला ?

उत्तर -  " गुगल डूडल " हा प्रसिद्ध करून Google ने त्यांना अभिवादन केले.



४. सावित्रीबाई फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला ?

उत्तर- 9 व्या वर्षी 



५. सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह केव्हा सुरु केले ?

उत्तर - २८ जानेवारी १८५३ 















To Top