➲ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर :-
नाव : विनायक दामोदर सावरकर
जन्म : २८ मे १८८३
मृत्यु : २६ फेब्रुवारी १९६६
वडील : दामोदर सावरकर
आई : राधाबाई सावरकर
जन्म ठिकाण : भगूर, नाशिक,महाराष्ट्र
धर्म : हिंदू
पत्नी : यमुनाबाई सावरकर
मुले/मुली : प्रभाकर सावरकर ,
प्रभा सावरकर,
शालिनी सावरकर,
विश्वास सावरकर.
चळवळ : भारतीय स्वातंत्रलढा
संघटना : अखिल भारतीय हिंदू महासभा,
अभिनव भारत .
स्वातंत्र्यवीर सावरकर |
२० व्या शतकातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, राष्ट्रभक्तांचे एक श्रेष्ठ वीरमणी , समाज क्रांतिकारकांचे प्रमुख अग्रणी म्हणून सावरकरांचे नाव सर्वांना परिचित आहे. भारताच्या स्वतंत्र संग्रामात उपार हालअपेष्टा भोगून , त्याग व धैर्य दाखवून आपल्या रोमहर्षक जीवनाने त्यांनी देशभक्तांवर आपल्या बुद्धिवादी व वैज्ञानिक विचारांचे अमृतचिंतन केले.श्रेष्ठ सुधारकांची सर्व वैशिष्ट्ये सावरकरांमध्ये होती . आधुनिक काळातील विज्ञानमहर्षी म्हणून सावरकरांचे नाव आदराने घ्यायला हवे .
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यांतील भगूर या गावी २८ मे १८८३ रोजी झाला.आईचे नाव राधाबाई व वडीलांचे नाव दामोदर त्यांना दोन भाऊ व एक बहिण होती. छोट्या विनायकला घरची मंडळी तात्या म्हणत, सधन,सुखवस्तू घरात विनायकांचे बालपण गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भगूर या गावी पार पडले,बालपणापासूनच त्यांना वाचनाचा व पाठांतराचा छंद होता.अनेक धार्मिक ग्रंथ, मोरोपंतांचे काव्य, इंग्रजी ग्रंथ त्यांनी लहानपणीच वाचले होते.माध्यमिक शिक्षण नाशिक व भगूर येथे झाले.
१२ मे १८९९ साली चाफेकर बंधूना फाशी दिली गेली.इंग्रजांचे अत्याचार, चाफेकर बंधूंचे हौतात्म्य यांसारख्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडत होत्या.त्यांच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षा उफाळून वर आली आणि वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी कुलदेवतेसमोर जाऊन शपथ घेतली, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरासारख्या मरेन किंव्हा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन, माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याच्या राज्याभिषेक करीन. यापुढे मी माझ्या देशाला स्वतंत्र मिळविण्यासाठी सशस्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मरेतो झुंजेन.
पंधराव्या वर्षी त्यांनी व त्यांच्या मित्रांनी मित्रमेळा नावाची आघाडी उघडली.त्याद्वारा राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्याकांक्षा जागविणारे कार्यक्रम ते घडवून आणीत.साप्ताहिक बैठकीत तात्या आपल्या अमोघ वकृत्वाने आपले विचार श्रोत्यांच्या गळी उतरवीत असत.१९०१ साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांचा विवाह झाला.फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आपल्या वकृत्वाने आणि कर्तुत्वाने सावरकरांनी पुण्याच्या लोकांची माने जिंकली, तरुणांचा एक समूह तयार केला . त्याला अभिनव भारत हे नाव दिले.
बी.ए. झाल्यावर ते अभ्यासाठी मुंबईत गेले.तेथे विहारी नावाच्या साप्ताहिक संपादक मंडळात काम करण्याचे त्यांना निमंत्रण मिळाले.पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी त्यांना शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली.लंडनला ते बॅरिस्टर ची पदवी घेण्यासाठी गेले होते, पण स्वातंत्र्यासाठी सशस्र क्रांती, त्याचा प्रसार व प्रचार, संघटना बांधणी,शस्त्रास्त्रांचा अभ्यास ही कामे सुद्धा त्यांना करायची होती. सावरकर लंडनमध्ये भारत भवन मध्ये राहत.त्यांच्या व्याख्यानानी तरुणांना स्फ्रूर्ती मिळे. ह्या काळात इटलीच्या स्वतंत्र लढ्याचा , वीर जोसेफ मॅझीनीच्या चरित्राचा व विचारांचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. त्यांनी मॅझीनीचे चरित्र लिहिले.
१९०७ साली १८५७च्या च्या बंडाला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी सावरकरांनी भारत-भवन (लंडन) येथे मोहत्सव केला आणि तेथे सावरकरांनी ओजस्वी भाषण केले.१९१० साली सावरकरांनी मारिया बोटीतून मारलेली उडी म्हणजे सागर विक्रम च होता. या सागर विक्रमामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगभर चर्चित गेला. त्यांना फ्रान्सच्या भूमीवर अटक झाली. ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध युद्धाचा प्रयत्न, त्यासाठी संघटन आणि शस्रांची गुप्त जमवाजमव जॅक्सन हत्याकांडी मदत या आरोपामुळे त्यांना दोन जन्मठेप (५० वर्षे ) शिक्षा ठोठावण्यात आल्या आणि १९१९ साली त्यांना शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात पाठविण्यात आले.
१९५८ साली त्यांच्या अमृतमहोत्सवानिम्मित त्यांना पुणे विद्यापिठाने डी.लिट ही पदवी दिली.सह सोनेरी पाने हा त्यांचा इतिहासप्रसिद्ध ग्रंथ होता. त्यांना मृत्युंजय म्हणतात.कारण आपल्या जीवनात मृत्यूशी अनेक वेळा झुंज देऊनही मृत्यु जीवनास घास घेऊ शकत नाही.शेवटी २६ फेब्रुवारी १९६६ त्यांनी २१ दिवसांच्या प्रायोप वेशानानंतर आत्मर्पन केले.
एक बुद्धिवादी,विज्ञानवादी,तत्वनिष्ठ.राष्ट्रवादी विचारवंत म्हणून सावरकरांचे जीवन हे सर्वांनाच वंदनीय ठरेल.
1966 मध्ये वीर सावरकर यांच्या
निधनानंतर भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटही जारी केले.
👉स्वातंत्रवीर सावरकरांचे प्रसिद्ध ग्रंथ व पुस्तके :-
- अंधश्रद्धा भाग १ व भाग २
- १८५७ चे स्वातंत्र्यसमर
- क्रांतीघोष
- काळे पाणी
- गरम गरम चिवडा
- गांधी आणि गोंधळ
- तेजस्वी तारे
- ऐतिहासिक निवेदने
- अंदमानच्या अंधेरीतून
- प्राचीन अर्वाचीन महिला
- भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
- मोपल्यांचे बंड
- सावरकरानांची पत्रे
- माझ्या आठवणी - भगूर
- महाकाव्य कमला
- माझी जन्मठेप
- भाषा शुद्धी
- महाकाव्य गोमांतक
- सावरकरांच्या गोष्टी भाग - १ ( कथा )
- सावरकरांच्या गोष्टी भाग - २ ( कथा )
- काळेपाणी ( कादंबरी )
- मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे ( कादंबरी )
➩ स्वतंत्रवीर सावरकर कोण होते ?
वीर
सावरकरांचा जन्म ब्राह्मण हिंदू कुटुंबात झाला. गणेश, मैनाबाई
आणि नारायण ही त्यांची भावंडं होती. ते त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते आणि
म्हणूनच त्यांना 'वीर' म्हणून
ओळखले जाऊ लागले. सावरकरांवर त्यांचा मोठा भाऊ गणेश यांचा खूप प्रभाव होता, ज्याने
त्यांच्या आयुष्यात प्रभावी भूमिका बजावली होती. वीर सावरकरांनी 'मित्र मेळा' या
नावाने एक संस्था स्थापन केली ज्याने लोकांना भारताच्या 'संपूर्ण
राजकीय स्वातंत्र्यासाठी' लढण्यासाठी
प्रेरित केले.
भारताच्या
स्वातंत्र्याच्या लढ्यात वीर सावरकरांचे नाव खूप महत्त्वाचे आहे. महान देशभक्त आणि
क्रांतिकारक सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले.
➩ क्रांतिकारी संघटनेची स्थापना :-
1940 मध्ये वीर सावरकरांनी पूना येथे 'अभिनव भारती' नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन
केली, ज्याचा उद्देश गरज भासल्यास बळाचा वापर करून स्वातंत्र्य मिळवणे हा होता.
👉स्वातंत्र्यवीर सावरकरावर एक छोटीशी फिल्म 👇:-
👉पुणे विद्यापिठाने स्वातंत्रवीर सावरकरांना दिलेली पदवी :-
१९५८ साली त्यांच्या अमृतमहोत्सवानिम्मित त्यांना पुणे विद्यापिठाने " डी.लिट " ही पदवी दिली.
👉स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल काही प्रश्न :-
१.अंदमानात असतांना सावररांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर - " Essentials of Hindutva "हा ग्रंथ लिहिला .
२.सावरकरांचा इतिहासप्रसिद्ध ग्रंथ कोणता ?
उत्तर : " सोनेरी पाने "
३. सावरकरांचा विवाह कधी झाला ?
उत्तर : "मार्च इ.स. १९०१ "
४. लंग्नानंतर सावरकरांनी कोणत्या विद्यालयात प्रवेश घेतला ?
उत्तर : " फर्ग्युसन "महाविद्यालय
५. सावरकरांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली ?
उत्तर : " राष्ट्रभक्तसमूह " ही संघटना