स्वामी विवेकानंद माहिती | Swami Vivekananda Information In Marathi

 


  •  स्वामी विवेकानंद :-

                                         " देशातील दारिद्र  व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय "



नाव :  नरेंद्रनाथ दत्त 

जन्म :  १२ जानेवारी १८६३ 

ठिकाण :  कलकत्ता , पश्चिम बंगाल , भारत 

आई :  भुवनेश्वरी देवी 

वडील :  विश्वनाथ दत्त 

धर्म :  हिंदू 

मृत्यु :  ४ जुलै १९०२ 

मृत्यु ठिकाण : बैलूर ,पश्चिम बंगाल , भारत 

लोकांनी दिलेली पदवी :  स्वामी विवेकानंद




स्वामी विवेकानंद 



भारताच्या पुनरुत्थानाच्या काळात आणि हिंदुधर्माच्या पुनरुज्जीवनाच्या काळात स्वामी विवेकानंदाचे स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय सामान्य जनतेला दैन्यावस्थेतून आणि अज्ञानातून सोडविण्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले. 



स्वामीजींचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८८३ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव भुवनेश्वरी व वडिलांचे नाव   विश्वनाथ दत्त . त्यांचे पाळण्यातील नाव वीरेश्वर असे होते. बिले,नरेंद्र अशा नावानेही त्यांना हाक मारली जाई . बालपणी त्यांनी वृत्ती खोडकर होती. बालपणीच त्यांच्या त  दानशुरपणा होता. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. बालवयातच कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. झाडावर ब्राम्हराक्षस वैगरे कोणी राहत नाही हे सगळे खोटे आहे हे त्यांनी लहानपणी झाडावर चढून त्यांनी सिद्ध करून दाखविले. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंत हे त्यांचे आदर्श होते. त्यांचे महाविद्यालयन शिक्षण कलकत्ता येथे झाले.



शाळेत असतांनाच त्यांचे वडील अभ्यासाबरोबर साहित्य,तत्वज्ञान इ. चा अभ्यास त्यांच्या कडून करून घेत . इंश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांचे वाकृत्वाबद्दल खूप कौतुक केले होते. जनरल असेंब्ली या कॉलेजातून तत्वज्ञान हा विषय घेऊन ते बी.ए. झाले प्राचार्य हेस्ट्री हे इंग्रजी शिकवीत  असतांना EXTASY  ह्या शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून झाला. त्यांचा अर्थ समाधी. त्यांची खरोखरच समाधी लागली.नरेंद्राने तेव्हापासून समाधी , ईश्वराचा शोध इ. विषयी चिंतन सुरु केले. आणि  ते रामकृष्ण परमहंसांकडे आले. 



रामकृष्ण  परमहंसांकडे आल्यावर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आपण ईश्वर पहिला आहे काय ? असा प्रश्न रामकृष्णाना विचाराताच त्यांची हो उत्तर दिले. मलाही ईश्वर पाहायचा आहे , ही तळमळ नेरेंद्राला लागली. नरेंद्र चिंतन , मनन , ध्यान-धारणा करू लागला. योग्य वेळ येताच रामकृष्णांनी त्यांना आपले अध्यात्मिक धन संक्रमित केले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे रामकृष्णांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले आणि मनुष्यसेवा करण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करण्याचे त्यांनी ठरवले.नदी,नाले,वळवंत , पर्वत तुडवीत ते फिरत राहिले. लोकांचे दु:ख , दैन्य ,अज्ञान,रोगराई,उपासमार इ. निरीक्षण केले. देशाचे सर्व दृष्टीने सुधारणा करण्याच्या व प्रगतीच्या दृष्टीने नि:स्वार्थ  भावनेने वाहून घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे  त्यांना वाटले . त्यांच्यामधील पुरुषार्थ डिसेंबर १८९२ असे तीन दिवस त्यांना खडकावर राहून चिंतन केलं. आणि लोकांना दैन्यावस्थेतून बाहेर काढले पाहिजे असे जीवितकार्य त्यांनी ठरविले.उठा जागे व्हा चांगले कार्य करा , थांबू नका हा अमृत बोध त्यांना झाला. 



अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरविली जात आहे. असे त्यांना समजले त्यासाठी तिथे जाण्याचे त्यांनी ठरविले . ११ सप्टेंबर १८९३ ला ते शिकोगोळा पोहचले , विवेकानंदानी भाषणाची वेळ आल्यावर आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो हे शब्द उच्चारले. टाळ्यांचा कडकडत झाला . अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली. स्वामीजींचे वकृत्व प्रभावी होते . त्यांच्या शब्दांनी तर सर्वांची हृदये जिंकून घेत.



पुढे इंग्लंडला गेल्यावर मार्गरेट नोबल त्यांच्या शिष्या झाल्या तिचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले. परदेशातून परतल्यावर त्यांनी १८९८ मध्ये रामकृष्ण मठ उभा केला. नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मठाचे ध्येयधोरण हे आध्यात्मिक व मानवसेवा होते.त्यांच्या मते, पश्चिमेला बार्ह्या  जग तर पुर्वेने आंतरिक जग जिंकण्याचे प्रयत्न केले होते . पण दोघांनी हातात हात घालून एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यकाळात नवे वळण दिले पाहिजे व धर्माने संकुचित दृष्टीकोनातून बाहेर काढून उदार व व्यापक दृष्टीकोन बनविण्यास मानवाला मदत केली पाहिजे असे ते म्हणत.



स्वामींचे संपूर्ण मानवजातीच्या अध्यात्मिक उद्धाराचे कार्य करणारे मार्गदर्शक स्तंभ होते. वेदांत हा प्रत्यक्ष  मावनाच्या ऐतिहासिक जीवनात कसा सुखकारक , समृद्ध व उन्नत असू शकतो . हे त्यांनी वेदान्ताला व्यावहारिक वेदान्ता म्हणतात. जेव्हा तुम्ही सर्वाकडे आत्मौपम्य दृष्टीने पाहाल तेव्हा ही स्त्री , हा पुरुष असा भेद तुमच्यात राहणार नाही असे स्वामीजी म्हणत. 


शेवटी असे कार्य करीत असतांना आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना जाणवले आणि ४ जुलै १९०२ रोजी ते पंचत्वात विलीन झाले. आपल्या तेजस्वी विचारांनी आणि कार्यांनी ते अमर झाले.


                                                                                             " मानवसेवा हीच ईश्वरसेवा "

                                                                                                                   - स्वामी विवेकानंद 





👉स्वामी विवेकानंदानी लोकांना दिलेली शिकवण :-


  • उठा जागे व्हा ,आणि आपले ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका .
  • प्रत्येक जीव हा मूळ स्वरुपात ईश्वरी आहे.
  • " दरिद्री नारायण " हा शब्द स्वामींनी जगाला दिला.
  • सर्व प्राणी मात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळे " शिवभावे जिवसेवा " हे रामकृष्ण यांचे वाचन त्यांनी शिरोधार्य मानले.
  • सर्व सजीव सृष्टीचा भाग आहे.






👉स्वामी विवेकानंदांबद्दल काही प्रश्न :



१. स्वामी विवेकानंदांनी धर्म संसदेत काय संदेश दिला ?

उत्तर : " मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे" असा संदेश त्यांनी दिला .

 

२.  स्वामी विवेकानंदानी सर्वधर्म परिषदेत पहिले व्याखान कधी दिले ?

उत्तर : अवघ्या ३० व्या वर्षी ( १८९३ साली ) शिकागो येथे.


३. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते ?

उत्तर :    "श्री. रामकृष्ण परमहंस "


४. स्वामी विवेकानंद किती वर्षे जगले ?

उत्तर :  " ३९ वर्षे "


५. स्वामी विवेकानंदांनी समाधी कुठे घेतली ?

उत्तर : "४ जुलै १९०२ बेलूर मठातील एका शांत खोलीत त्यांनी महासमाधी घेतली."

















To Top